Why Ganesh Chaturthi is Celebrated : भारतामध्ये दरवर्षी गणेशोत्सव अपार उत्साहाने आणि जल्लोषात साजरा केला जातो. गणरायाच्या आगमनाची आतुरता भक्तांना वर्षभर असते, आणि गणेश चतुर्थीच्या शुभदिनी या उत्सवाची सुरुवात होते. ‘विनायक चतुर्थी’ म्हणूनही ओळखला जाणारा हा सण भारतीय सणांपैकी सर्वांत लोकप्रिय सण आहे.
भगवान शंकर आणि देवी पार्वती यांचा पुत्र गणपती हिंदू धर्मात आराध्यदैवत मानला जातो. बुद्धी, समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक, सुखकर्ता व विघ्नहर्ता म्हणून त्याची पूजा केली जाते. १४ विद्या व ६४ कला ज्याच्या अधिपत्याखाली आहेत, त्याच गणेशाची कोणत्याही मंगल कार्याची सुरुवात करण्यापूर्वी पूजा केली जाते. भक्तांची सर्व अडथळे दूर करणार्या गणेशाला ‘विघ्नहर्ता’ ही म्हटले जाते.
भाद्रपद महिन्यात, साधारणपणे ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान येणारी गणेश चतुर्थी देशभर साजरी केली जाते. विशेषत: महाराष्ट्र, गुजरात, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांत हा सण अतिशय भक्तिभावाने आणि आनंदात साजरा होतो.
गणेश चतुर्थीचे महत्त्व (Importance of Ganesh Chaturthi)
पौराणिक मान्यतेनुसार, ज्या दिवशी महादेव शंकर आणि माता पार्वतीचा मुलगा गणेश जन्माला आले, तो दिवस म्हणजे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्थी होती. म्हणून या दिवसाला गणेश चतुर्थी आणि विनायक चतुर्थी म्हणून ओळखले जाते. श्रीगणेशाच्या पूजेमुळे घरात सुख, समृद्धी आणि भरभराट होते, असे मानले जाते. कोणत्याही शुभकार्यात विघ्न येऊ नये म्हणून गणेशाची आराधना करतात.
गणेश चतुर्थी २०२५ तारीख आणि शुभ मुहूर्त (Ganesh Chaturthi 2025 date and auspicious time)
हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. या दिवसापासून पुढील २१ दिवसांपर्यंत गणेशोत्सव सुरू राहील.
हिंदू पंचांगानुसार,
यंदा २७ सप्टेंबर २०२५ रोजी गणेश चतुर्थी साजरी होईल.
तिथी सुरू: २७ सप्टेंबर दुपारी ३:४३
तिथी समाप्त: २८ सप्टेंबर संध्याकाळी ५:५६
शुभ मुहूर्त: सकाळी ११:०५ ते दुपारी १:४० (२ तास ३४ मिनिटे)
या वेळी घरोघरी श्री गणेशाची मूर्ती प्राणप्रतिष्ठापित करून पूजा-अर्चा केली जाईल. पुढील १० दिवस गणेशोत्सव उत्साहाने साजरा होईल
गणेश चतुर्थी का साजरी केली जाते? काय आहे गणपती बाप्पाच्या जन्माची कथा (What is the story of the birth of Lord Ganesha/Why is Ganesh Chaturthi celebrated)
हिंदू पौराणिक कथेवर आधारित भगवान गणेश भगवान शिव आणि देवी पार्वतीचा पुत्र असल्याचे मानले जाते. गणेश चतुर्थी हा दिवस गणपतीच्या जन्माचा उत्सव आहे. त्यामागची कथा निश्चित आपण अनेकदा ऐकली असेल. पौराणिक कथेनुसार, या दिवशी माता पार्वती स्नानासाठी जाताना आपल्या अंगावरील मळापासून एका लहानशा मुलाची मूर्ती तयार करते आणि त्यात प्राण ओतते. या लहान मुलाला देवी पार्वती आपले स्नान होईपर्यंत आपल्या कक्षाबाहेर पहारा देण्यास सांगते आणि कोणालाही आत प्रवेश न देण्याची सूचना देते. त्याप्रमाणे हा मुलगा आपल्या मातेच्या आज्ञेचे पालन करतो आणि कक्षाबाहेर पहारा देत असतो. त्याच वेळी देवी पार्वतीचे पती महादेव देवी पार्वतीला भेटण्यासाठी तिथे येतात. त्या क्षणी गणेश आणि महादेव दोघेही एकमेकांना ओळखत नसतात. गणेश आपला पुत्र आहे हे भगवान शंकर यांना माहीत नसते आणि महादेवच आपले पिता आहेत हे गणेश यांना माहीत नसते. त्यामुळे तो लहान मुलगा महादेवांना माता पार्वतीच्या कक्षात प्रवेश करण्यास मनाई करतो. महादेवदेखील ते मान्य करत नाही आणि हा लहान मुलगादेखील मागे हटत नाही. महादेवांना राग अनावर होतो आणि दोघांमधील वाद टोकाला जातो आणि शंकर आपल्या त्रिशूळाने त्या मुलाचे शिर धडापासून वेगळे करतात. तोपर्यंत माता पार्वती स्नान आटोपून बाहेर येते आणि आपल्या मुलाची अशी अवस्था पाहून अत्यंत दुःखी व संतप्त होते. आपल्या मुलाला पुन्हा जिवंत करण्याचा हट्ट ती भगवान शंकराकडे धरते. त्यावेळी, भगवान शंकर त्याच्या देवतांना उत्तर दिशेला सर्वांत पहिल्यांदा जो प्राणी दिसेल त्याचे डोके आणण्यास सांगतात. त्यानुसार देवतांना हत्तीचे डोके सापडते. अखेर भगवान शंकर ते हत्तीचे डोके त्या लहान मुलाच्या धडाला जोडतात आणि श्रीगणेश पुन्हा जिवंत होतात, अशी ही यामागील दंतकथा प्रसिद्ध आहे.
कशी साजरी करतात गणेश चतुर्थी? (How to celebrate Ganesh Chaturthi?)
- घराची स्वच्छता व सुंदर सजावट केली जाते.
- गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून १६ पद्धतींनी पूजन केले जाते.
- लाल चंदन, जास्वंदाची फुले, दूर्वा आणि २१ मोदकांचा नैवेद्य अर्पण केला जातो.
- उपासनेदरम्यान गणेश स्तोत्र, गणेश उपनिषद आणि मंत्र पठण केले जाते.
- दहाव्या दिवशी मोठ्या मिरवणुकीसह गणरायाचे विसर्जन केले जाते.
गणेशोत्सवाचे महत्व ( Importance of Ganesh Chaturthi)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हा उत्सव विशेष उत्साहात साजरा होत असे. नंतर लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला नवा चेहरा दिला आणि समाजातील सर्व जाती-धर्मातील लोकांना एकत्र आणून स्वातंत्र्यलढ्यात एकतेचे प्रतिक म्हणून हा उत्सव रुजवला.
आज गणेशोत्सव केवळ धार्मिक नाही तर सांस्कृतिक व सामाजिक एकतेचे प्रतीक आहे. गणरायाची उपासना केल्याने मनोकामना पूर्ण होतात, पापांचा नाश होतो आणि जीवनात सुख-समृद्धी येते अशी भक्तांची श्रद्धा आहे.