अगदी आनंदात आणि उत्साहात सुरु झालेला गणेशोत्सव बघता बघता संपला सुद्धा. काल ५ सप्टेंबरला सात दिवसांच्या गणपती बाप्पांचे विसर्जन झाले. भक्तांनी जड मनाने आणि अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला आहे पुढच्या वर्षी लवकर येण्यास सांगितले. काल महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये गणपतीचे विसर्जन झाले. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यातच कोल्हापूरतून एक व्हिडीओ समोर आला आहे.

या व्हिडीओमध्ये आपल्याला गणपतीच्या विसर्जनाची अनोखी पद्धत पाहायला मिळत आहे. कोल्हापुरातील एका गावाचा हा व्हिडीओ आहे. गावकरी एका तलावाच्या शेजारी उभे आहे. येथे एक यंत्र बसवण्यात आले आहे. या यंत्रावर गणपती ठेवले की पट्टी सरकायला सुरुवात होते. हळू हळू हाणपतीच्या मुर्त्या पुढे जातात आणि नंतर पाण्यात विसर्जित होतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हायरल भयानी (Viral Bhayani) या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय, “आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला सोयीस्कर, आदरपूर्वक आणि भावनिक निरोप देण्याचा सर्वात नाविन्यपूर्ण आणि स्वदेश मार्ग! हे अप्रतिम आहे.” या व्हिडीओला आतापर्यंत १ लाख २९ लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. तसेच या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रियाही येत आहेत. बाप्पाच्या विसर्जनाची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा.