Ganesh Chaturthi 2022 Date and Time: दरवर्षीप्रमाणे भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाईल. या चतुर्थीला सिद्धी विनायक व्रत असेही म्हटले जाते. या दिवशी देशाच्या अनेक ठिकाणी लोक श्रीगणेशाच्या मूर्तीची पूजा करतात. या वर्षी बुधवार ३१ ऑगस्टला, भाद्रपद शुक्ल चतुर्थी आहे. दरवर्षी गणपतीच्या मूर्तींच्या नवनवीन शैली कारखान्यात पाहायला मिळतात. पण तुम्हाला माहीत आहे का की या प्रत्येक मूर्तीमागे बाप्पाच्या विविध रूपांची महती दडलेली आहे. पुराणानुसार, विविध रंगाच्या गणेश मूर्तींमध्ये विशिष्ट अर्थ सामावलेला असतो. जर आपण यंदा गणेश चतुर्थी निमित्त आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा घरातही एखादी छोटी गणेश मूर्ती ठेवू इच्छित असाल तर या रंगसंगतीचे अर्थ आधी जाणून घेऊयात..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिवळ्या रंगाचे गणपती

पिवळ्या रंगाचे गणपती हे ६ भुजाधारी असतात ज्यांना हरिद्रा गणपती असेही म्हंटले जाते. कोवळ्या हळदीच्या खोडाप्रमाणे या मूर्तीचा रंग असतो. घरातील सुख समृद्धी साठी व कौटुंबिक समाधानासाठी या रंगाची गणेशमूर्ती शुभ मानली जाते.

(Ganesh Chaturthi 2022 : गणेश चतुर्थी निमित्त Whatsapp Status, Facebook वर शेअर करा बाप्पाच्या HD Images व मराठी शुभेच्छापत्र)

लाल रंगाचे गणपती

लाल रंगाच्या गणेशमूर्ती या सहसा चतुर्भुजधारी असतात. लाल रंगाच्या बाप्पांना संकष्टहरण गणपती म्हणूनही ओळखले जाते. कामाच्या डेस्कवर लाल गणेशमूर्तीची स्थापना करणे पवित्र मानले जाते.

सफेद रंगाचे बाप्पा

श्वेत रंगाच्या गणेशमूर्तींना द्विज गणेशा म्हणूनही संबोधले जाते. या मूर्ती सुद्धा चतुर्भुजधारी असतात. विशेषतः विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या ठिकाणी सफेद गणेश मूर्ती स्थापन करणे शुभ मानले जाते. विद्येची देवता म्हणून ओळखला जाणारा बाप्पा पांढऱ्या रंगातील मूर्ती मोहक दिसतात.

Gauri Ganpati 2022: यंदा गणपतीत ज्येष्ठा गौरी आवाहन कधी? जाणून घ्या तारीख, वेळ, पूजा विधी

निळ्या रंगातील गणेश मूर्ती

नीलरंगात रंगलेल्या गणेशमूर्तींना उच्छिट गणेशा म्हणून ओळखले जाते. चतुर्भुजधारी गणेशाची निळ्या रंगातील मूर्ती ही नियमांमध्ये न अडकता पुजली जाते. आभाळाप्रमाणे सर्वसमावेशक विचार या निळ्या रंगाच्या मूर्तीत सामावलेला असतो. सहसा अशा मूर्तीच्या पूजनाआधी आपल्या ज्योतिष अभ्यासक गुरुजींचा सल्ला घ्यावा.

ऋणमोचन गणपती

या गणेशमूर्ती सूर्याप्रमाणे प्रखर पिवळ्या रंगात असून त्यांना लाल वस्त्र धारण करणे आवडते अशी मान्यता आहे. असं म्हणतात कर्जमुक्तीसाठी प्रार्थना करताना अशा रूपातील गणरायाचे पूजन हिताचे ठरते.

महागणपती

गणेशाच्या विविध रूपांना सामावून घेणारे हे स्वरूप आहे. रक्तवर्ण त्रिनेत्रधारी गणेशाची ही मूर्ती दशभुजाधारी साकारली जाते. शक्यतो अशा मूर्ती घरी पुजल्या जात नाहीत मात्र गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळात त्यांचे पूजन होते.

दरम्यान गणेशाच्या आगमनाला आता फार प्रतीक्षा करावी लागणार नाही, अर्थात प्रत्यक्ष बाप्पा घरी येणार म्हणजे भक्तांच्या उत्साहाला काही मोजमाप राहत नाही. कोणती आरास करायची, नैवेद्य काय असणार ते बाप्पाच्या आगमनाला कपडे काय घालायचे सगळी तयारी आधीपासूनच तुमच्याकडेही सुरु झाली असेल. गणेशोत्सवातील तुमचे अनुभव कमेंटद्वारे आमच्यासोबतही शेअर करा.

(टीप- सदर लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व गणेश उत्सव २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Red blue white colours in ganpati idol depicts different meaning know puja vidhi svs
First published on: 23-08-2022 at 18:55 IST