लठ्ठपणा हा आजकालच्या जीवनातील महत्त्वाचा प्रश्न ठरला आहे. या गोष्टीचा आपल्या व्यक्तिमत्त्वावरही वाईट परिणाम होतो. जेव्हा वजन मर्यादेपेक्षा जास्त वाढते, तेव्हा लोक वजन कमी करण्याचे मार्ग शोधू लागतात. बरेच लोक वजन कमी करण्यासाठी योग्य डाएट घेतात, तर अनेकांना घरगुती उपचारांच्या मदतीने वजन नियंत्रित करायचे असते. पण जेव्हा सर्व कष्ट करूनही निकाल समोर येत नाही, तेव्हा ते व्यायामशाळा, प्रोटीन्स असे उपाय शोधतात. परंतु वजन कमी करण्यासाठी योग्य आहार कोणता असावा, हे आपल्याला हे माहीत असणे आवश्यक आहे.

वजन कमी करण्याचे सहा सोपे उपाय

  • जर आपल्याला चरबी कमी करायची असेल तर प्रथम प्रथिने कमी खा.
  • तळलेल्या गोष्टीऐवजी ग्रील्ड गोष्टी खा. ग्रील्ड पदार्थ आपल्या शरीरात चरबी निर्माण होऊ देत नाहीत.
  • मद्यपान, कोल्ड्रिंक आणि मिठाईपासून दूर रहा. या गोष्टींमुळे चरबी कमी होण्यास बराच वेळ लागतो.
  • उच्च कॅलरीयुक्त अन्नापासून दूर रहा. एका दिवसात आपण बर्न करू शकता इतक्याचच कॅलरी घ्या.
  • न्याहरीत बदाम खा. यात प्रथिने असतात, जे स्नायू आणि फायबरचे प्रमाण योग्य ठेवतात. या गोष्टींमुळे रात्रीच्या वेळी आपल्याला जास्त भूक लागत नाही. चरबी कमी करण्यासाठी हे एक ‘सुपरफूड’ मानले जाते.
  • जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर कोबी, हिरव्या भाज्या भरपूर खा. त्यामध्ये कार्बोहायड्रेट आणि कॅलरी कमी असतात, तर फायबर भरपूर असते. जरी आपण त्यांना जास्त प्रमाणात खाल्ले, तरी ते आपल्या वजनावर परिणाम करणार नाहीत.