आयपीएलच्या या सहाव्या हंगामात श्रीलंकेच्या खेळाडूंना चेन्नईत खेळता येणार नसले तरी राजकारणामुळे खेळभावना कमी होणार नाही, असे मत सनरायजर्स हैदराबाद संघाचा कर्णधार कुमार संगकारा याने व्यक्त केले.
श्रीलंकेत तामिळींविरुद्ध होणाऱ्या कारवाईंवरून तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी राज्यामध्ये श्रीलंकेच्या खेळाडूंना प्रवेश बंदी करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आयपीएलच्या कार्यकारिणी समितीने स्पर्धेच्या वेळापत्रकात बदल केला आणि श्रीलंकेचे खेळाडू चेन्नईपासून कसे लांब राहतील, याची दक्षता घेतली.
राजकारणामुळे आमच्या प्रवेशावर परिणाम होत आहे, पण भारतातील कोणत्याही भागात आम्ही जाऊ शकतो, यावर माझा विश्वास आहे. पण माझ्या मते राजकारणाचा खेळ, खेळाडू आणि खेळभावनेवर परिणाम होणार नाही, असे संगकारा म्हणाला.