IPL 2022 : RCBला मिळू शकतो ‘मुंबईकर’ कप्तान..! टीम इंडियाच्या सलामीवीराचेही नाव चर्चेत

विराट कोहली RCBच्या कप्तानपदावरून पायउतार झाला आहे. त्यामुळे संघ नव्या कप्तानाच्या शोधात आहे.

shreyas iyer and kl rahul may be contenders for new captain of rcb report
आरसीबी नव्या कप्तानाच्या शोधात

पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलमध्ये आरसीबीचा कर्णधार राहणार नसल्याचे विराट कोहलीने आधीच जाहीर केले होते. अशा स्थितीत संघाला नवा कर्णधार शोधावा लागणार आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, या पदासाठी मुंबईकर श्रेयस अय्यर किंवा केएल राहुल यांची निवड केली जाऊ शकते. यासाठी दोघांचीही दावेदारांमध्ये गणना केली जात आहे.

डीएनएच्या वृत्तानुसार, या रिक्त पदासाठी राहुल आणि अय्यर हे प्रबळ दावेदार आहेत. कोहलीच्या कार्यकाळात आरसीबीला विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यात अपयश आले. यंदा आयपीएलसाठी मेगा लिलाव होणार आहे, त्यामुळे आरसीबीलाही संघात कोणती नावे समाविष्ट करायची आहेत, हे पाहावे लागेल. लेखी यादी बाहेर येण्यासाठी सर्वांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. यामध्ये कोणते खेळाडू सहभागी होणार हेही महत्त्वाचे ठरणार आहे. याबाबत बीसीसीआयने यापूर्वीच सूचना जारी केल्या आहेत.

हेही वाचा – विराटला टीम इंडियातून मिळणार होता डच्चू! सेहवागचा मोठा खुलासा; म्हणाला, “धोनी आणि…”

केएल राहुलने पंजाब किंग्जचे कर्णधार असताना वैयक्तिकरित्या चांगली कामगिरी केली. परंतु तो संघाला विजेतेपद मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. राहुलने सलग दोन मोसमात फलंदाजीत शानदार कामगिरी केली. अशा परिस्थितीत जर त्याने आरसीबीमध्ये जाऊन कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली, तर तिथे त्याचा खेळ पाहण्यासारखा असेल.

श्रेयस अय्यरने गेल्या वर्षी दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद भूषवले होते. त्याच्या नेतृत्वाखाली दिल्लीने अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास केला होता. यावेळी दुखापतीमुळे त्याच्या जागी ऋषभ पंतला कर्णधार करण्यात आले. मात्र, यावेळीही दिल्लीचा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचण्यात यशस्वी ठरला. अशा परिस्थितीत पंतला कर्णधारपदी ठेवून संघाला पुढे नेण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व आयपीएल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shreyas iyer and kl rahul may be contenders for new captain of rcb report adn

Next Story
विजयी भव !
ताज्या बातम्या