News Flash

IPL 2018 – धोनीच्या चेन्नई संघाचा आणखी एक विक्रम

या हंगामात अनेक विक्रम मोडण्यात आले. त्यातच महेंद्र सिंग धोनीच्या चेन्नईच्या संघाने एक महत्वाचा विक्रम केला.

IPL 2018 हे अनेक कारणांमुळे लोकप्रिय झाले. हंगामाच्या अंतिम सामन्यात चेन्नईच्या संघाने हैदराबादवर विजय मिळवत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. शेन वॉटसनने सामन्यात आपली छाप उमटवत साऱ्यांना चकित केले. या हंगामात अनेक विक्रम मोडण्यात आले. त्यातच महेंद्र सिंग धोनीच्या चेन्नईच्या संघाने एक महत्वाचा विक्रम केला.

चेन्नई संघाने यंदाच्या आयपीएलमध्ये एकूण १४५ षटकार खेचले. एका संघाने एका हंगामात मारलेले हे सर्वाधिक षटकार ठरले. चेन्नईच्या सर्वच खेळाडूंनी दमदार खेळ केल्यामुळे चेन्नईला ही कामगिरी करता आली. चेन्नईने ही कामगिरी करत बंगळुरू संघाचा विक्रम मोडीत काढला. बंगळुरू संघाने २०१६ साली आयपीएलच्या हंगामात १४२ षटकार खेचले होते.

चेन्नईच्या या कामगिरीत शेन वॉटसन, अंबाती रायुडू आणि कर्णधार महेंद्र सिंग धोनी या तिघांचे मोलाचे योगदान होते. त्या तिघांनी संपूर्ण हंगामात प्रत्येकी ३० पेक्षा अधिक षटकार मारले. यात शेन वॉटसनने सर्वाधिक ३५, रायुडूने ३४ तर धोनीने ३० षटकार मारले. या तिघांनी सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अनुक्रमे दुसरे, तिसरे आणि सातवे स्थान पटकावले. सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीत वॉटसनला केवळ षटकार कमी पडले. ३७ षटकारांसह या यादीत ऋषभ पंतने अव्वल स्थान राखले. त्याला त्याच्या या कामहीरीसाठी गौरविण्याही आले.

२०१६ साली बंगळुरू संघाने सर्वाधिक १४२ षटकार मारले होते. त्यावेळी बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीसह एकूण ४ खेळाडू पहिल्या १० मध्ये होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2018 1:16 pm

Web Title: csk hit record most sixes in single season
टॅग : Csk,Ipl,Ms Dhoni
Next Stories
1 IPL 2018 – … म्हणून रशीद खानला कमी पडल्या फक्त तीन विकेट
2 सचिन तेंडुलकरचं एक ट्विट आणि रशीद खान झाला सुपरहिट
3 IPL 2018 – वानखेडेवर नव्हे; तर ‘येथे’ पाहिला सचिनने अंतिम सामना
Just Now!
X