विराट कोहलीच्या बेंगळुरु संघानं प्रथम फलंदाजी करत निर्धारित २० षटकांत २०१ धावा केल्या. बंगळुरुकडून अॅरॉन फिंच, देविदत्त पडिक्कल आणि डिव्हिलिअर्स यांनी दमदार फलंदाजी करत संघाला २०० धावांचा टप्पा पार करुन दिला. बंगळुरुने दिलेल्या या लक्षाचा पाठलाग करताना मुंबईची सरुवात खराब झाली आहे. मुंबईने १०० धावांच्या आत आपले ४ फलंदाज गमावले.

रोहित शर्मा, डि कॉक, सुर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या स्वस्तात बाद झाले. यातील महत्वाची गोष्ट म्हणजे मुंबईच्या तीन खेळाडूंचे झेल आरसीबीच्या बदली खेळाडूने घेतले आहेत. फिंचच्या जागेवर बदली खेळाडू म्हणून पवन नेगी क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर उतरला होता. पवन नेगीने उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण करत महत्वाच्या तीन फलंदाचे झेल अचूक घेतले. बंगळुरुच्या यशामध्ये पवन नेगीचेही महत्वाचे योगदान आहे.

पवन नेगीने मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा(८), डिकॉक(१४) आणि हार्दिक पांड्या(१५) यांचे अचूक झेल टिपले. आयपीएलच्या इतिहासात एखाद्या बदली खेळाडूने तीन झेल घेण्याची कदाचीत ही पहिलीच घटना असेल. बंगळुरुच्या गोलंदाजांनी टिचून मारा करत मुंबईच्या फलंदाजांना बाद केलं. चहल, झॅम्पा, सैनी, सुंदर यांनी आपल्या लौकिकास साजेशी गोलंदाजी केली.