01 December 2020

News Flash

IPL 2020 : दिल्लीचा हुकुमी एक्का वाया, स्टॉयनिसला पहिल्याच चेंडूवर बाद करत बोल्टचा विक्रम

मुंबईची धडाकेबाज सुरुवात

गतविजेत्या मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या तेराव्या हंगामात आपल्या लौकिकाला साजेशी सुरुवात केली आहे. नाणेफेक जिंकून दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईकडून ट्रेंट बोल्टने पहिल्याच चेंडूवर दिल्लीच्या मार्कस स्टॉयनिसला माघारी धाडत आयपीएलच्या इतिहासात विक्रमाची नोंद केली. आयपीएलच्या अंतिम सामन्यात पहिल्याच चेंडूवर विकेट पडण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.

हैदराबादविरुद्धच्या सामन्यात दिल्लीने आपल्या फलंदाजीत बदल करत स्टॉयनिसला सलामीला संधी दिली होती. सुदैवाने हैदराबादविरुद्ध सामन्यात स्टॉयनिस-शिखर धवन जोडीने चांगली सुरुवात केली. परंतू मुंबईविरुद्ध दिल्लीचं हे ट्रम्प कार्ड पूर्णपणे फेल गेलं. पाहा स्टॉयनिसच्या विकेटचा हा व्हिडीओ…

दरम्यान दिल्लीने अंतिम सामन्यासाठी संघात कोणतेही बदल केलेले नसले तरीही मुंबईने संघात एक बदल करत राहुल चहरऐवजी जयंत यादवला स्थान दिलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2020 7:44 pm

Web Title: ipl 2020 trent boult takes wicket on first ball first time in ipl history psd 91
टॅग IPL 2020
Next Stories
1 अंतिम सामन्यात रोहितने खेळला मोठा डाव, चहरला बाहेरचा रस्ता; जयंत यादवला संघात स्थान
2 IPL का किंग कौन?….. मुंबई इंडियन्स! पाचव्यांदा जिंकलं विजेतेपद
3 IPL 2020 : रोहित शर्माचं विक्रमी ‘द्विशतक’, धोनीच्या यादीत मिळवलं स्थान
Just Now!
X