बहुप्रतिक्षित IPL 2020 साठी २० ऑगस्टपासून सर्व संघांना युएईला जाण्याची परवानगी BCCIने दिली. मुंबईचा संघही युएईला रवाना झाला. आपला क्वारंटाइन कालावधी संपवून मुंबईच्या संघाने युएईमध्ये सरावास सुरुवातदेखील केली. याच सरावादरम्यान चाहत्यांकडून रोहित शर्माची फलंदाजी विरूद्ध जसप्रीत बुमराहची गोलंदाजी असा सामना होऊन जाऊदे अशी एक मागणी होती. या मागणीचा विचार करत अखेर मुंबई इंडियन्सने या दोन प्रतिभावंत खेळाडूंचा दमदार असा सामना घडवून आणला आणि त्यात एक खेळाडू विजयी झाला.

रोहित vs बुमराह… पाहा व्हिडीओ-

मुंबई संघाने सरावादरम्यानचे अनेक फोटो ट्विटर अकाउंटवरुन शेअर केले. त्यावेळी चाहत्यांना रोहित विरूद्ध बुमराह सामना पाहायचा होता. हा सामना शूट करून मुंबई इंडियन्स संघाने त्याचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला. या व्हिडिओत कर्णधार रोहित आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांच्यात क्रिकेटचा नव्हे, तर चक्क ‘रॉक पेपर सिझर्स’चा सामना रंगला. खेळात दगड, कागद आणि कात्री अशा तीन गोष्टींच्या तीन खुणा असतात. दगडाने कात्री ठेचली जाऊ शकते म्हणून दगड श्रेष्ठ, कात्रीने कागद कापला जाऊ शकतो म्हणून कात्री श्रेष्ठ तर कागदाने दगडाला गुंडाळून ठेवता येऊ शकतं म्हणून दगड श्रेष्ठ अशा पद्धतीचा हा खेळ असतो. रोहित आणि बुमराहमध्ये हाच खेळ खेळला गेला. त्यात बुमराहने विजय मिळवला.