चेन्नई आणि तिरूअनंतपुरम विभागाचा निकाल जाहीर केल्यानंतर सीबीएसई बोर्डाने आपल्या इतर सहा विभागांचा निकालही बुधवारी जाहीर केला. या निकालात भुवनेश्वर विभागाने बाजी मारली असून या विभागाचा निकाल ८६.२५ टक्के लागला आहे. तर अजमेरच्या निकालात मुलींनी बाजी मारली असून मुलींचा निकाल ९०.१९ टक्के लागला आहे. दरम्यान, सीबीएसई बोर्डाच्या दिल्ली आणि देहरादून विभागाचे निकाल जाहीर करण्यात आलेले नसून गुरुवारी हे निकाल जाहीर होतील.
अजमेर, पंचकुला, गुवाहाटी, अलाहाबाद, भुवनेश्वर आणि पटना या विभागांचा निकाल जाहीर झाला. या सहा विभागाच्या निकालावर भुवनेश्वर विभागापाठोपाठ अजमेर विभागाचा ८६.२२ टक्के आणि पंचकुला ८२.८४ टक्के इतका लागला आहे. आजच्या सहाही विभागांच्या निकालात जवळपास सर्वच विभागाच्या निकालात मुलींनी आपली छाप पाडली आहे. मुंबईचा समावेश असलेल्या चेन्नई विभागचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला होता.
संग्रहित लेख, दिनांक 29th May 2014 रोजी प्रकाशित
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर
चेन्नई आणि तिरूअनंतपुरम विभागाचा निकाल जाहीर केल्यानंतर सीबीएसई बोर्डाने आपल्या इतर सहा विभागांचा निकालही बुधवारी जाहीर केला.
First published on: 29-05-2014 at 07:23 IST
मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cbse class 12th results declared