मानमरातब आणि पैसा याखेरीज कामाचे समाधान मिळवून देणाऱ्या वकिली क्षेत्रासंबंधी स्पेशलाइज्ड अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. वकिली क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रम व त्यांच्या प्रवेशप्रक्रियेविषयी..
वेगवेगळ्या प्रकारच्या संघर्षांचे प्रमाण वाढत असल्याने अन्यायाच्या विरुद्ध दाद मागण्यासाठी कोर्टाची पायरी चढणाऱ्या सर्वसामान्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वकिलीचा व्यवसाय हा उत्तम पसा, नाव आणि कामाचे समाधान मिळवून देणारा व्यवसाय आहे. ही बाब या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी ध्यानात घ्यायला हवी. या क्षेत्रात गेल्या काही वर्षांत स्पेशलाइज्ड तज्ज्ञांची गरज भासू लागली आहे. तुम्ही तुमच्या क्षेत्रात किती पारंगत आहात, यावर तुमचा करिअर आलेख उंचावला जाऊ शकतो. एलएलबी, त्यानंतर एलएलएम वा विशिष्ट विषयातील पदव्युत्तर पदविका केल्यानंतर वकिली व्यवसायात उत्तमोत्तम संधी मिळू शकतात. हे अभ्यासक्रम दर्जेदार महाविद्यालयांमधून पूर्ण केल्यास अधिक उत्तम. देशातील काही महाविद्यालयांमध्ये बारावीनंतरचे एकात्मिक एलएलबी अभ्यासक्रमही सुरू करण्यात आले आहेत.
नॅशनल लॉ युनिव्हर्सीटि :
बारावीनंतर पाच वष्रे कालावधीच्या एलएलबीचे अभ्यासक्रम राज्यातील अनेक विधी महाविद्यालयांनी सुरू केले असले तरी तरी दिल्लीस्थित नॅशनल लॉ युनिव्हर्सीटिचे या क्षेत्रात आगळे महत्त्व आहे. या विद्यापीठाची स्थापना २००८ साली करण्यात आली. या संस्थेत प्रवेश मिळावा, म्हणून देशभरातील विद्यार्थी प्रयत्न करीत असतात. या संस्थेच्या वतीने बीए, एलएलबी- ऑनर्स हा पाच र्वष कालावधीचा एकात्मिक अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.
प्रवेश परीक्षेचा पॅटर्न :
या अभ्यासक्रमाला ऑल इंडिया लॉ एन्ट्रन्स टेस्ट या प्रवेशपरीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो. ही परीक्षा दीड तासांची असते. यामध्ये १५० प्रश्न विचारले जातात. या प्रश्नपत्रिकेत इंग्रजी, लीगल अॅप्टिटय़ूड, रिझिनग आणि सामान्य ज्ञान या विषयांवर प्रत्येकी ३५ गुणांचे प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान या घटकामध्ये इतिहास, भूगोल, चालू घडामोडी, सामान्य विज्ञान, अर्थशास्त्र, नागरिकशास्त्र या विषयांवरील प्रश्न विचारले जातात. अंकगणितावर १० गुणांचे प्रश्न विचारले जातील.
* परीक्षा केंद्रे – ही परीक्षा देशभरातील विविध केंद्रांसोबतच मुंबई, भोपाळ, अहमदाबाद, हैदराबाद येथे दरवर्षी एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवडय़ात घेतली जाते. या परीक्षेद्वारे ७० उमेदवारांना प्रवेश दिला जातो. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी खुल्या संवर्गातील उमेदवारांना किमान ४० टक्केआणि राखीव संवर्गातील उमेदवारांना ३० टक्के गुण प्राप्त करावे लागतील. १५ टक्के जागा अनुसूचित जाती, ७.५ टक्के जागा अनुसूचित जमाती आणि ३ टक्के जागा अपंग संवर्गासाठी राखीव ठेवण्यात येतात.
* अर्हता : कोणत्याही शाखेतील बारावीमध्ये ५० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. वर्यामर्यादा १ जुल २०१३ रोजी २१ वर्षांपेक्षा कमी असावे. अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांसाठी वयोमर्यादेत पाच वर्षांची सवलत.
* शुल्क : या अभ्यासक्रमासाठी प्रत्येक वर्षांला साधारणत: ७०
हजार रुपये फी लागेल. यामध्ये वसतिगृह आणि मेसचा खर्चही समावेश आहे. गरजू उमेदवारांना आíथक साहाय्यही उपलब्ध करून दिले जाते.
* अर्ज व माहितीपत्रक : अर्ज व माहितीपत्रकाची किंमत २५०० रुपये. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गासाठी एक हजार रुपये. या रकमेचा डिमांड डठाफ्ट रजिस्ट्रार नॅशनल लॉ युनिव्हर्सिटि दिल्ली या नावे काढून पाठवा. हा अर्ज http://www.nludelhi.ac.in आणि ww.nludelhi.admissionhelp.com, या वेबसाइटवरून डाऊनलोड करता येईल. शिवाय याच वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज भरता येतो. पत्ता- द रजिस्ट्रार, नॅशनल लॉ स्कूल ऑफ दिल्ली, सेक्टर-१४, द्वारका, न्यू दिल्ली- ११००७८ दूरध्वनी- ०११-२८३४९९३ ई-मेल- info@nuldelhi.ac.in
शासकीय विधि महाविद्यालय मुंबई :
(बॅचलर ऑफ लीगल सायन्स) हा पाच वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. बारावीमध्ये मिळालेल्या गुणांवर आधारित या अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जातो. हा अभ्यासक्रम बारावीतील कोणत्याही शाखेतील विद्यार्थ्यांना करता येतो. प्रवेशासाठी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांची स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार केली जाते. प्रत्येक शाखांसाठी जागा राखीव असतात. विद्यार्थ्यांना बारावीत ४५ टक्के गुण मिळायला हवेत. शासन अनुदानित तुकडीमध्ये १६० आणि विनाअनुदानित तुकडीमध्ये ८० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. या अभ्यासक्रमाला प्रत्येक वर्षी साधारणत: सहा ते सात हजार रुपये फी आकारली जाते.
पत्ता- शासकीय विधि महाविद्यालय, ए रोड- चर्चगेट, मुंबई- ४०००२०. दूरध्वनी- ०२२-२२०४१७०७, फॅक्स- २२८५१३१५. वेबसाइट- http://www.glcmumbai.com ई-मेल- glctudentcouncil@gmail.com
सिम्बॉयसिस लॉ स्कूल : सिम्बॉयसिस इन्टरनॅशनल युनिव्हर्सटिीच्या अंतर्गत सिम्बॉयसिस लॉ स्कूल कार्यरत आहे. या संस्थेमार्फत बॅचलर ऑफ आर्ट अॅण्ड एलएलबी (एकूण जागा- ५०) आणि बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन अॅण्ड एलएलबी (एकूण जागा१५०) हे अभ्याक्रम सुरू करण्यात आले आहेत. दोन्ही अभ्यासक्रमांचा कालावधी प्रत्येकी पाच वर्षे. अर्हता- कोणत्याही विषयातील बारावी उत्तीर्ण विद्यार्थी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतो. मात्र त्यास बारावी परीक्षेत ४५ टक्के गुण मिळायला हवेत. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गाच्या विद्यार्थ्यांना ४० टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.
* परीक्षा आणि प्रवेश प्रक्रिया : या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सिम्बॉयसिस एन्ट्रन्स टेस्ट घेतली जाते. ही परीक्षा पुणे, नागपूर, मुंबई आणि नाशिक येथे घेण्यात येते. या प्रवेशपरीक्षेचा पेपर हा बहुपर्यायी वस्तुनिष्ठ पद्धतीचा राहील. यामध्ये १५० प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण ठेवण्यात आला आहे. हे प्रश्न १) लॉजिकल रिझिनग – एकूण गुण ३० २) लीगल रिझिनग – एकूण गुण ३०
३) अनॉलिटिकल रिझिनग – एकूण गुण ३० ४) रीडिंग कॉम्प्रेहेन्शन – एकूण गुण ३० ५) जनरल नॉलेज – एकूण गुण ३० या विषयांवर विचारले जातात. http://www.set-test.org या वेबसाइटवर नोंदणी करावी लागते. पत्ता- सिम्बॉयसिस लॉ स्कूल, सेनापती रोड पुणे- ४११००४, दूरध्वनी-०२०२५६७१७११. वेबसाइट- http://www.symlaw.ac.in. या अभ्यासक्रमाचे शुल्क दरवर्षी साधारणत: एक लाख ४६ हजार रुपये.
संग्रहित लेख, दिनांक 11th May 2013 रोजी प्रकाशित
वकील व्हायचंय?
मानमरातब आणि पैसा याखेरीज कामाचे समाधान मिळवून देणाऱ्या वकिली क्षेत्रासंबंधी स्पेशलाइज्ड अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. वकिली क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रम व त्यांच्या प्रवेशप्रक्रियेविषयी.. वेगवेगळ्या प्रकारच्या संघर्षांचे प्रमाण वाढत असल्याने अन्यायाच्या विरुद्ध दाद मागण्यासाठी कोर्टाची पायरी चढणाऱ्या सर्वसामान्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. व
First published on: 11-05-2013 at 05:57 IST
मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to become a lawyer