scorecardresearch

Premium

आज दहावीचा निकाल

दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या (शुक्रवारी) ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी १ नंतर http://mahresult.nic.in, www.msbshse.ac.in, www.mh-hsc.ac.in, www.hscresult.mkcl.org आणि www.rediff.com/exams या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल. या परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण या संकेतस्थळावर पाहता येतील व त्याची प्रिंटआऊटही घेता येईल.

आज दहावीचा निकाल

दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या (शुक्रवारी) ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी १ नंतर  http://mahresult.nic.in, http://www.msbshse.ac.in, http://www.mh-hsc.ac.in, http://www.hscresult.mkcl.org आणि http://www.rediff.com/exams  या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल. या परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण या संकेतस्थळावर पाहता येतील व त्याची प्रिंटआऊटही घेता येईल. त्याचबरोबर बीएसएनएलच्या ५७७६६ या क्रमांकावर MHSSC <Seat No>  या शॉर्टकोडवर हा निकाल उपलब्ध होईल.
ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर आठ दिवसांनी म्हणजे १५ जूनला विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिका शाळांमधून मिळतील. ज्या विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी करावयाची आहे त्यांनी मूळ गुणपत्रिका प्राप्त झाल्यावर अर्ज आणि शुल्कासह २५ जूनपर्यंत संबंधित विभागीय मंडळाकडे अर्ज करायचा आहे. अर्जासोबत मूळ गुणपत्रिकेची छायाप्रत जोडणे अनिवार्य आहे. ऑक्टोबर, २०१३च्या परीक्षेसाठी २५ जूनपर्यंत तर विलंब शुल्कासह २९ जूनपर्यंत अर्ज स्वीकारले जातील.
सर्व विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल उंचावण्यासाठी श्रेणी सुधार योजनेअंतर्गत परीक्षेला पुन्हा बसण्याची संधी मिळणार आहे. या विद्यार्थ्यांना ऑक्टोबर, २०१३ व मार्च, २०१४ अशा दोन संधी उपलब्ध राहतील. विद्यार्थ्यांनी मागणी केल्यास त्यांना उत्तरपत्रिकेची छायाप्रत दिली जाईल. त्यासाठी ऑनलाईन निकालानंतर लगेचच अर्ज करता येऊ शकेल. २७ जूनपर्यंत हे अर्ज स्वीकारले जातील. उत्तरपत्रिकेच्या पुनर्मुल्यांकनासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनाही छायाप्रत मिळविणे बंधनकारक आहे. छायाप्रत मिळाल्यापासून पाच दिवसात पुनर्मुल्यांकनासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. गरजू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विभागीय मंडळ स्तरावर समुपदेशांची २४ तास हेल्पलाईन सुविधाही देण्यात येणार आहे.
समुपदेशकांचे नाव आणि भ्रमणध्वनी पुढीलप्रमाणे
ए.डी. सरोदे – ९३२२५२७०७६
स्मि.न. शिपुरकर – ९८१९०१६२७०
संजय चौधरी – ९८६९०२२२२४
मुरलीधर मोरे – ९३२२१०५६१८
विकास जाधव – ९८६७८७४६२३, ९९६७९३७१११
बी. के. ह्य़ाळीज – ९४२३९४७२६६
अनिलकुमार गाढे – ९९६९०३८०२०
चं.ज.मुंढे – ९८६९३०७६५७
ज.पा.घाडगे – ९८६७९०६१२९
नीता खोत – ९८९२७७९३२२

harideep singh nijjar
पार्किंगजवळ अडवली गाडी, झाडल्या ५० गोळ्या; हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा थरारक घटनाक्रम वाचा!
Parineeti troll
“ही तर हद्द झाली…,” लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी परिणीती चोप्रा ट्रोल, अभिनेत्रीबद्दल नाराजी व्यक्त करत नेटकरी म्हणाले…
Fire at Wedding Hall in Iraq
लग्नाच्या हॉलमध्ये भीषण आग, वधू-वरासह १०० जणांचा होरपळून मृत्यू, १५० हून अधिक जखमी
IND vs AUS: It's not easy to hit the ball where there is no fielder Aussie legend Mark Waugh's big statement on Suryakumar
Suryakumar Yadav: “फिल्डर नसलेल्या ठिकाणी चेंडू मारणे…”, ऑस्ट्रेलियन दिग्गज ‘मार्क वॉ’ चे सूर्यकुमारबाबत मोठे विधान

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-06-2013 at 01:49 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×