News Flash

कोल्हापूर : जिल्ह्यात एकाच दिवसात दोनशेहून अधिक करोनाबाधित

सोमवारपासून सात दिवस लॉकडाउन जाहीर

प्रतिकात्मक छायाचित्र

कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करोनाबाधित रुग्णसंख्येत शुक्रवारी विक्रमी नोंद करण्यात आली. मध्यरात्रीपासूनची बाधितांची संख्या २७७ झाली. त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण इचलकरंजी व कोल्हापूर शहरात आढळले. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करोना बाधित रुग्णसंख्येने दीड हजाराचा टप्पा ओलांडला. जिल्ह्यातील करोना प्रतिबंध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली असतानाही रुग्णसंख्या वाढतच आहे. काल मध्यरात्री पासून प्राप्त अहवाल नुसार २७७ रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळले. कोल्हापूर शहरात ५० पेक्षा अधिक रुग्ण आढळले.

सर्वाधिक रुग्ण असलेल्या इचलकरंजी एकच दिवसात ८० रुग्ण आढळल्याने शहर हादरलं. इतक्या मोठ्या प्रमाणात आकडा वाढण्याचा पहिलाच दिवस होता. इचलकरंजीसाठी आजचा दिवस धोक्याची घंटा ठरली. शहरांची संख्या तीनशेहून अधिक झाली. यातील ६० रूग्ण बरे झाले तर १६ जणांचा मृत्यू झाला. शहरातील वेगवेगळ्या भागात नवे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले.

इचलकरंजी व कोल्हापूर शहरात तसेच ग्रामीण भागातही करोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढू लागल्याने सोमवारपासून पुन्हा टाळेबंदीचा दुसरा टप्पा घोषित केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करोना बाधित रुग्ण संख्येत झपाट्याने होणारी वाढ आणि मृत्यूचे वाढते प्रमाण पाहता जिल्ह्यात टाळेबंदी जाहीर करण्याची मागणी होत आहे. मात्र याबाबत जिल्ह्यातील मंत्री, राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधींमध्ये मतभिन्नता असल्याचे शुक्रवारी दिसून आल्याने सकाळी झालेला ठोस निर्णय झाला नाही. अखेर सायंकाळी कोल्हापूर जिल्ह्यात सोमवार पासून सात दिवसाची टाळेबंदी जाहीर करण्यात आली. या कालावधीत दूध आणि औषध दुकाने सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2020 8:13 pm

Web Title: kolhapur found more than 200 covid 19 cases in last 24 hours vjb 91
Next Stories
1 महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात सोमवारपासून सात दिवस लॉकडाउन
2 चंद्रकांतदादा, शासनाला स्वस्तातील औषध मिळवून द्या – हसन मुश्रीफ यांचे आव्हान
3 मुखपट्टय़ा निर्मितीत नामांकित कंपन्या, मरगळलेल्या वस्त्रोद्योगाला दिलासा
Just Now!
X