23 September 2020

News Flash

‘मोदींच्या विचाराला साद घालणारा  खासदार कोल्हापुरातून निवडून येईल’

भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी राफेल या मुद्दय़ावर पत्रकारांशी संवाद साधला.

(संग्रहित छायाचित्र)

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. यामध्ये कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव चर्चेत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत कोल्हापुरातून मोदींच्या विचाराला साद घालणारा खासदार निवडून येईल, असा विश्वास भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी राफेल या मुद्दय़ावर पत्रकारांशी संवाद साधला.  राफेल विषय मांडत उपाध्ये यांनी सरकारच्या भूमिकेचे समर्थन करून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टिका केली.

ते म्हणाले की, केंद्रातील भाजपा सरकारने गेल्या साडेचार वर्षांत पारदर्शक कारभार केला आहे. भ्रष्टाचाराचा एकही आरोप भाजपावर नसल्याने कॉँग्रेसकडून कोणत्याही मुद्दय़ावर केंद्राला घेरता येत नसल्यानेच राफेल कराराबाबत केंद्र सरकारवर बिनबुडाचे आरोप लावले जात आहेत.

संसदेत राफेलप्रश्नी संरक्षकमंत्री निर्मला सीतारामन आणि वित्त मंत्री अरुण जेटली यांनी उत्तर दिले असतानाही काँग्रेस अजून सुद्धा रडीचा डाव खेळत आहे. सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळत असून सुद्धा ती  स्वीकारण्याची मानसिकता काँग्रेस पक्षाची नाही, अशी टीका त्यांनी केली.

योग्य प्रकारचे उत्तर मिळत आहे ते स्वीकारण्याची आणि संवादाची तयारी काँग्रेसने दाखवायला पाहिजे. ‘आम्ही बंधू तेच धोरण आम्ही बंधू तेच तोरण’ अशा प्रकारची काँग्रेसची एकाधिकारशाहीची भूमिका असून या वृत्तीला आमचा आक्षेप आहे, असेही ते म्हणाले.  या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला क्लिन चिट दिली असल्याने राहुल गांधीं यांनी देशाची माफी मागितली पहिजे, अशी मागणी त्यांनी केली. विरोधकांना भाजपाच्या विरोधात प्रचाराचा मुद्दा सापडत नसल्यामुळे त्यांनी दिशाभूल करून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे.  राम मंदिराच्या मुद्दय़ावर सुरू असलेल्या वादावर बोलताना ते म्हणाले, राम मंदिर हा भाजपच्या अस्थेचा मुद्दा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2019 2:11 am

Web Title: modi thought mp will be elected from kolhapur constituency
Next Stories
1 साखरेच्या किंमत वाढीस नकार देताना इंधन दरवाढ कशी चालते – मुश्रीफ
2 इचलकरंजीत उद्योजकाचा खून
3 ‘पंचगंगे’च्या शुद्धीकरणासाठी नेतेमंडळींची लगबग
Just Now!
X