News Flash

शिवाजी विद्यापीठाला ‘उदयोन्मुख’ दर्जा; ५० लाखांचा निधी मंजूर

सुमारे ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या एका उपक्रमास महाराष्ट्र राज्य नवोपक्रम संस्थेकडून ‘उदयोन्मुख’ केंद्राचा दर्जा प्राप्त झाला आहे. त्या अंतर्गत सुमारे ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. ही माहिती केंद्राचे संचालक डॉ. एम. एस. देशमुख यांनी दिली आहे.

ते म्हणाले, विद्यापीठांची प्राथमिक, उदयोन्मुख, नेतृत्वकर्ता अशी विभागणी केली असून उदयोन्मुख प्रकारात शिवाजी विद्यापीठाच्या केंद्राचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात ३५ तर दोन टप्प्यांत मिळून ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नवोपपक्रमांची सुरुवात, विविध कार्यक्रम, कार्यशाळा, नवीन सहकार्य संधींचे विकसन, रोजगार निर्मितीस प्रोत्साहन आणि नवोपक्रमांना बाह्य संस्थांकडून निधी प्राप्तीस प्रोत्साहन इत्यादी उपक्रम केंद्राकडून राबवण्यात येणार आहेत.

कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के म्हणाले, ग्रामीण भागातील नवकल्पना निर्माण करणाऱ्या, युवकांना, नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्याचा हेतू आहे. त्यांना ‘प्रयोगशाळा ते बाजारपेठ’ असे मूर्त स्वरूप देणे शक्य होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2021 12:20 am

Web Title: status of emerging center by maharashtra state innovation institute for an initiative of shivaji university akp 94
Next Stories
1 इचलकरंजीत करोना रुग्णालयात अतिदक्षता विभागाला आग
2 घरात बसून पगार  घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना  नूतन संचालकांचा इशारा
3 कापड विक्री थंडावली, सौदे रद्द
Just Now!
X