कोल्हापूर : कोल्हापूर-राधानगरी रस्त्यावरील कौलव येथे मंगळवारी सकाळी ट्रक व दुचाकीची धडक झाली. या अपघातात भाऊ, बहीण आणि दोन वर्षांच्या भाचीसह तीन जणांचा मृत्यू झाला. या घटनेत भाऊ – बहिणीसह दोन जण जागीच ठार झाले. तर त्यांची पुतणी आणि भाची गंभीर जखमी झाले. त्यांना कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान दोन वर्षांच्या भाचीचा मृत्यू झाला.

धडक दिल्यानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. पोलीस अधिक तपास करत आहेत. श्रीकांत बाबासाहेब कांबळे (वय २७, तरसांबळे, ता. राधानगरी), कागल तालुक्यातील शेंदूर गावातील त्याची बहीण दीपाली गुरुनाथ कांबळे (वय ३१), पुतणी कौशिकी सचिन कांबळे (वय २) अशी मृत्यू पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत. अथर्व गुरुनाथ कांबळे असे जखमी मुलाचे नाव आहे.

अपघातात मृत्यू पावलेला श्रीकांत कांबळे हा पुण्यात एका खासगी कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत होता. पंधरवड्यापूर्वी त्याच्या लहान मुलीचे निधन झाल्यामुळे तो काही काळासाठी गावी आला होता. त्याची बहीण दीपाली हिचा पती काही वर्षांपूर्वी निधन पावल्यामुळे ती आपल्या माहेरी तरसांबळे येथे राहत होती. या दोन्ही कुटुंबांवर नियतीने आणखी एक भीषण हल्ला केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

राधानगरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकांत हे बहीण दीपाली यांना तिच्या गावातून घेऊन भोगावती येथे गेले होते. तेथे दिवाळीसाठी खरेदी केल्यानंतर वरील चार जण तरसांबळे गावाकडे दुचाकीवरून परतत होते. एका भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला कौलव गावाजवळ जोरदार धडक दिली. या घटनेत भाऊ – बहिणीसह दोन जण जागीच ठार झाले. तर त्यांची पुतणी आणि भाची गंभीर जखमी झाले. त्यांना कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान दोन वर्षांच्या भाचीचा मृत्यू झाला. धडक दिल्यानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. पोलीस अधिक तपास करत आहेत.

नियतीचा घाला