कोल्हापूर: आदमापूर येथील बाळू मामा मंदिराच्या विश्वस्तामधील वाद बुधवारी आणखी चिघळला आहे. बाळूमामा देवालय विश्वस्त मंडळातील कार्याध्यक्ष व नवीन विश्वस्तांची निवड कायदेशीर असल्याचा दावा कार्याध्यक्ष धैर्यशील राजे भोसले यांनी केला आहे. तर, विश्वस्त सरपंच गणेश गुरव यांच्या उपस्थितीत आज विश्वस्त मंडळाचे बैठक होऊन रावसाहेब कोनेकरी यांची कार्याध्यक्षपदी निवड झाली. या बैठकीस १२ पैकी ८ विश्वस्त उपस्थित असल्याचा दावा करण्यात आला आहे.

बाळूमामा मंदिराचे अधिकृत विश्वस्त कोण यावरून काल कोल्हापुरात विश्वस्त सरपंच गुरव व कार्याध्यक्ष भोसले यांच्यात हाणामारी झाली होती. यानंतर आज दोन्ही गटाकडून गतिमान हालचाली झाल्या. कार्याध्यक्ष भोसले यांनी १८ जानेवारी रोजीच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत ५ नवीन विश्वस्त म्हणून घेण्यास मान्यता देण्यात आली होती. हे लोक गावातील असल्याने विरोध सुरू आहे. कर्नाटकातील लोकांची निवड करून मंदिराचा कारभार तिकडे नेला जाणार आहे का? असा सवाल केला.

आणखी वाचा- कोल्हापूर : जोतिबा यात्रेसाठी तीन लाखांवर भाविक, सासनकाठ्या दाखल; आज मुख्य दिवस

दरम्यान, आज विश्वस्त भिकाजी शिंगारे यांच्या अध्यक्षतेखाली आदमापुरात बैठक होऊन कार्याध्यक्षपदी रावसाहेब कोनेकरी यांची निवड झाली. यावेळी सरपंच गुरव यांच्यासह बारा पैकी आठ विश्वस्त उपस्थित होते. विश्वस्त मंडळात महाराष्ट्रातील आठ तर कर्नाटकातील तिघांचा समावेश आहे. बाळुमामाची बकरी चार महिने कर्नाटक असल्याने आणि विश्वस्त मंडळात महाराष्ट्र-कर्नाटक असा पूर्वीपासून समावेश आहे, असे स्पष्टीकरणही करण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कार्यालय प्रथमच बंद

विश्वस्त मंडळातील वादाचा परिणाम आज बाळूमामाचे मुख्य कार्यालय बंद होण्यात झाला. मंदिराच्या मागे असणाऱ्या कार्यालयातून कारभार पाहिला जातो. पण दिवसभर कार्यालय बंद असल्याने त्याचा त्रास भक्तांना झाला.