कोल्हापूर : महायुतीचे कोल्हापूरचे उमेदवार संजय मंडलिक आणि इचलकरंजीचे उमेदवार धैर्यशील माने यांचा उमेदवारी अर्ज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शनाने उद्या सोमवारी उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे. काल कोल्हापुरात आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सायंकाळपासून पहाटे चार पर्यंत लोकसभा निवडणुकीच्या जोडण्या लावण्यामध्ये व्यस्त होते. त्यानंतर ते मुंबईला गेले. पण उद्या सोमवारी ते पुन्हा कोल्हापुरात येणार असल्याने लोकसभा निवडणुकीचे राजकारण गतिमान झाले आहे.

उद्या नेते व कार्यकर्ते गांधी मैदान येथे जमणार आहेत. तेथून शक्ती प्रदर्शनाने सर्वजण जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणार आहेत. छत्रपती शिवाजी चौक आणि खानविलकर पेट्रोल पंप चौक येथे मनोगते होतील.

हेही वाचा : “खलनायक नव्हे नायक!”, इचलकरंजीच्या पाणी योजनेवर राजू शेट्टी यांची मार्मिक टिप्पणी

यांची उपस्थिती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पालक मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक तसेच आमदार विनय कोरे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, समरजीतसिंह घाटगे यांची उपस्थिती असणार आहे.

हेही वाचा : हातकणंगलेची जागा कायम राखण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे भेटीसत्र

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रकाश आवाडेंची उपस्थिती ?

दरम्यान, इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी स्वतंत्र अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर त्यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे नमूद केले होते. तथापि, आज महायुतीच्या पत्रकात आमदार आवाडे हे उद्या उपस्थित राहणार असल्याचा उल्लेख केला आहे. यामुळे आवाडे यांची भूमिका बदलली का अशी चर्चा सुरु होती.