लोकसत्ता प्रतिनिधी

कोल्हापूर: युगप्रवर्तक हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा प्रथमच नवीन राजवाड्यात विविध कार्यक्रमांनी मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. तर जिल्हा परिषदेत शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारण्यात आली.

या सोहळ्यासाठी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, याज्ञसेनीराजे छत्रपती महाराणी, मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती आदींसह मान्यवर उपस्थित होते. यशराजराजे छत्रपती यांनी सुवर्ण जडित शिवरायांच्या प्रतिमेचा राज्याभिषेक केला. पोवाडा, शौर्य गीते, स्फूर्ती गीते, मर्दानी खेळ अशा विविध कार्यक्रमांनी वातावरण भारावून गेले होते.

आणखी वाचा-आक्षेपार्ह स्टेटस लावण्याने कोल्हापुरात तणाव, दगडफेकीचे प्रकार; उद्या कोल्हापूर बंदचे आवाहन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवशक राजदंड स्वराज्य गुढी

कोल्हापूर जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारण्यात आली. आशा स्वयंसेविका तसेच नृत्य दिग्दर्शक सागर बगाडे व अन्य कलाकारांनी शिवचरित्रातील प्रसंगांचे नृत्य- नाट्याच्या माध्यमातून सादरीकरण केले. लाठीकाठीच्या प्रात्यक्षिकांना दाद दिली. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अष्टप्रधान मंडळ, मावळ्यांच्या वेषभूषेने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.