कोल्हापूर : पावसाने उघडीत दिल्यानंतर करवीर निवासीनी महालक्ष्मी , दख्खनचा राजा जोतिबा देवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी वाढली आहे. पर्यटकांचा ओघ वाढल्याने पर्यटन स्थळे बहरली आहेत. वर्षा पर्यटनाच्या ठिकाणीही मोठी गर्दी होऊ लागली आहे. गेल्या पंधरवड्यात राज्यभरात मुसळधार पाऊस पडला. कोल्हापुरात पंचगंगा नदी इशारा पातळीच्या दिशेने वाहू लागली होती. ६० हुन अधिक बंधारे पाण्याखाली गेले होते. पाऊसमान वाढल्याने कोल्हापुरातील पर्यटकांचा पर्यटकांचा ओघ कमी झाला होता.
गेले चार दिवस पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आता उत्तरोत्तर भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरात गेल्या तीन दिवसात अनुक्रमे २९ हजार ४३८, ३३, हजार १०६ व ७९ हजार १०६ इतक्या भाविकांनी दर्शन घेतले, अशी माहिती व्यवस्थापक महादेव दिंडे यांनी आज दिली.
देवस्थान, किल्ले पन्हाळा येथेही भाविक, पर्यटकांची लगबग वाढली आहे. शहरातील रंकाळा चौपाटी, न्यू पॅलेस, कणेरी मठ, खिद्रापूर, जोतिबा आणि पन्हाळा येथेही वावर वाढला आहे. कोल्हापूरात पर्यटन, भाविकांची संख्या वाढली असल्याने वाहन तळे वाहनांनी भरून गेली आहेत. शहरात इतरत्र वाहनांची गर्दी दिसू लागली आहे. सलग सुट्ट्यांमुळे पुणे -बेंगलोर महामार्गावरील कोल्हापूरचे प्रवेशद्वार असलेल्या किणी टोल नाका येथे आज वाहनांची रीघ लागली होती. टोल यंत्रणेला तारेवरची कसरत करावी लागली. सुट्टींमुळे कोल्हापुरला भेट देणाऱ्यांची संख्या वाढली आहे. येथून अनेकांनी कर्नाटक, गोवा, कोकण येथे जाण्याचे नियोजन केलेले दिसते. परिणामी महामार्गावरील धाबे, हॉटेल पर्यटकांनी भरलेले आहेत. प्रवासी संख्या वाढल्याने एसटी महामंडळाला चांगला फायदा होताना दिसत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात धार्मिक, ऐतिहासिक, गडकोट, निसर्गसौंदर्य अशी पर्यटनाची अनेक स्थळे आहेत. सुट्टी असल्याने या पर्यटनस्थळी पर्यटकांचा राबता वाढला होता. महालक्ष्मी, जोतीबा, नृसिंहवाडी, रंकाळा, न्यू पॅलेस म्युझियम, टाऊन हॉल म्युझियम येथे अधिक गर्दी होती.
श्री करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिर परिसर आराखड्याच्या १५०० ओटी तर व श्री जोतिबा मंदिर परिसर विकास आराखड्याच्या २६० कोटीच्या आराखड्याला मंगळवारी मान्यता देण्यात आली असून या कामांना गती आली आहे. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून त्यांच्या मंदिर पुनर्निर्माणाच्या कार्याला अभिवादन म्हणून राज्यातील विविध मंदिर विकास आराखड्यांना एकूण ५५०३ कोटी रुपयांची राज्यस्तरीय मंजुरी देण्यात आली आहे.पालकमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रकाश आबिटकर यांनी जिल्ह्यातील महत्वाच्या प्रलंबित विषयांत विशेष लक्ष घालून प्रयत्न सुरू केले