लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : उद्योगपती गौतम अदानी यांच्यासोबत शरद पवार यांची बैठक झाली ही वस्तुस्थिती आहे, असे विधान करून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या म्हणण्याला बुधवारी दुजोरा दिला.

भाजपा आणि राष्ट्रवादी पक्षात बोलणी करण्यासाठी शरद पवार, अमित शहा, गौतम अदानी आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात ५ वर्षांपूर्वी बैठक पार पडली होती, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. तर या घडामोडी घडत असताना उद्योगपती गौतम अदानी यांच्या सोबत झालेली बैठक ही वस्तुस्थिती असल्याचा दावा वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांनी करत पवार यांची पाठराखण केली आहे.

आणखी वाचा-केंद्रीय वस्त्रोद्योग समितीवर धैर्यशील माने, सुनेत्रा पवार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बारामतीत अजित पवार विरोधात योगेंद्र पवार अशी लढत होत आहे. उपमुख्यमंत्री पवार यांच्या प्रचारात पवार कुटुंबातील सदस्यांचा दुरावा असल्याने ते एकाकी पडले आहेत का, या प्रश्नावर मुश्रीफ यांनी अजित पवार एकटे असले तरी बारामतीची जनता त्यांच्या मागे खंबीरपणे उभे असल्याने विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला. १७ नोव्हेंबरला माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, अभिनेते सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत बेबी चौकात सांगता सभा होणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.