‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने पाश्चात्त्य संस्कृती आणि अपप्रकार रोखण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. हिंदू जनजागृती समितेने कागलचे तहसीलदार शांताराम सांगडे, श्री शाहू हायस्कूल ज्युनिअर महाविद्यालय आणि डी. आर. माने महाविद्यालय येथे याचे निवेदन दिले आहे.
या वेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे, उपतालुका प्रमुख शिवगोंडा पाटील, श्री शिवप्रतिष्ठानचे कागल तालुकाप्रमुख विजय आरेकर, शिवसनिक सुरेश वैद्य, आनंदा पाटील, रंगराव पाटील, अमोल बारड, हिंदू जनजागृती समितीचे संतोष सणगर, प्रीतम पवार, दीपक भोपळे आदी कार्यकत्रे उपस्थित होते.
माने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण चौगुले यांनी हिंदू जनजागृती समितीचे उपक्रम महाविद्यालयात राबवण्यात येतील. तसेच ‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात येईल, असे सांगितले. श्री शाहू हायस्कूल ज्युनिअर महाविद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील पसाले यांनाही निवेदन देण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 11th Feb 2016 रोजी प्रकाशित
‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचे निवेदन
‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने पाश्चात्त्य संस्कृती आणि अपप्रकार रोखण्याची मागणी
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 11-02-2016 at 03:15 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hinduism activists statement on the occasion of valentine day