कोल्हापूर : सुळकूड योजना अंमलबजावणीसाठी आज इचलकरंजी येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ लाक्षणिक उपोषण सुरू झाले. यामध्ये नागरिक, महिला, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

इचलकरंजीसाठी कागल तालुक्यातील दूधगंगा नदीतून सुळकुड गावातून अमृत दोन योजनेअंतर्गत नळ पाणी योजनेला मंजुरी मिळाली आहे. सुळकूड पाणी योजना कार्यान्वित करण्याबाबत मुख्यमंत्री यांनी दि. ११ सप्टेंबर रोजी मुंबई येथे आयोजित केलेली बैठक पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर ही बैठक अद्याप होऊ शकली नाही. त्यामुळे आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा – ऊसाचा दुसरा हप्ता प्रश्नी कोल्हापुरातील बैठक निष्फळ; साखर कारखानदारांचा नकार

हेही वाचा – कोल्हापूर: महालक्ष्मी मंदिरातील नवरात्र उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

कृति समितीचे सर्व प्रमुख या उपोषणात सहभागी झाले आहेत. इचलकरंजीला पाणी मिळालेच पाहिजे, पाणी आमच्या हक्काचे, पाणी द्या-न्याय द्या अशा घोषणा देण्यात येत होत्या.