कोल्हापूर: खासदार धनंजय महाडिक हे संजय मंडलिक यांच्या प्रचारात सक्रिय आहेत. या मंडलिक -महाडिक एकीचीच सतेज पाटील यांना भीती वाटत असावी, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या येथील मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर मंत्री पाटील बोलत होते. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, काँग्रेस सरकारला सुचले नाही ते नरेंद्र मोदींनी करून दाखवले. महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण,ग्रामीण भागातील महिलांसाठी शौचालय, नळाला पाणी अशा योजना राबवल्या.

खासदार धनंजय महाडिक म्हणाले, काँग्रेसच्या काळात घोटाळा, भ्रष्टाचारांची मालिका होती. आता मोदी सरकारने देशाचा नावलौकिक उंचावला आहे. समरजीतसिंह घाटगे म्हणाले , दहा वर्षांतील मोदींच्या योजनांच्या ताकदीवर विरोधकांना चोख उत्तर देऊ.

हेही वाचा : “शाहू महाराजांचा राजहट्ट…”, महायुतीचे उमेदवार संजय मंडलिकांचा टोला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मी कसलेला मल्ल – मंडलिक

आज गुढीपाडव्याच्या दिवशी प्रचंड रॅली काढून महिलांनी प्रचाराची घेतलेली आघाडी ताकद देणारी आहे, असा उल्लेख करून संजय मंडलिक म्हणाले, गादीचा सन्मान हा भाग वेगळा आहे. पण मोदींचे हिंदुत्व व राजर्षि शाहू महाराजांचे पुरोगामी विचार घेऊनच लढत आहे. समोर कसलेला मल्ल असला तरी भिडायचे हे वडील सदाशिवराव मंडलिक यांचे बाळकडू आहे.