कोल्हापूर : सगळेच पक्ष आम्हाला हे आमचे नव्हेत म्हणतात. दोन्हीकडून आम्हाला बाजूला सारले जाते. मला भाजपची बी टीम सुद्धा म्हणतात. मला भाजपने हरवले असताना असे कसे म्हंटले जाते, अशी विचारणा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी येथे केली. मराठा आरक्षणावर त्यांनी सर्वच पक्षांवर टीकास्त्र डागले. ते म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादी केवळ मराठ्यांचा पक्ष म्हणून उरला आहे. भाजप, शिवसेना भूमिका स्पष्ट करत नाहीत. भाजप झुंजी लावून कसे लढतात हे बघत बसला आहे. सगेसोयरे आरक्षणाला आमचा विरोध आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात सगेसोयरे आरक्षण नाकारले आहे. मराठा समाजाचे ओबीसी आरक्षण देखील टिकणार नसल्याने योग्य सल्ला घेऊन हे काम केले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

हेही वाचा : गावठी पिस्तूल विक्री प्रकरणी कोल्हापुरात एकास अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यातील तिसऱ्या आघाडी बाबत ते म्हणाले, हा प्रयोग यशस्वी विभागवार केल्यास शक्य आहे. दुर्दैवाने राजू शेट्टी याचा विचार करत नाहीत. संभाजी राजे छत्रपती आपल्या भूमिकेवर ठाम राहत नसल्याने त्यांच्याबरोबर जायला इच्छुक नाही. राज्यात कोणाची सत्ता येईल हे सांगता येत नाही. बदल निश्चित असला तरी या त्यांच्या तोंडावर दंगली का होत आहेत हा प्रश्नचं आहे.