कोल्हापूर : तुम्हाला अपेक्षित असलेली ब्रेकिंग न्युज लवकरच येईल. ती फक्त ब्रेकिंग न्युज नसेल जबाबदारी असेल, असे सूचक विधान करीत श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी  कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील मतदारसंघातून महाविकास आघाडीची उमेदवारी मिळणार असल्याचे मंगळवारी स्पष्ट केले.पत्रकार विजय पाटील यांच्या ‘ब्रेकिंग न्यूज’ या पुस्तकाचे प्रकाशन आज श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी हे मोठे सुचक विधान केले.

कार्यक्रमास पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले, ज्येष्ठ पत्रकार विजय पाटील, ज्येष्ठ पत्रकार राजकुमार चौगुले, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, प्रेस क्लबचे अध्यक्ष शितल धनवडे, लेखक इंद्रजीत सावंत आदी उपस्थित होते.गेल्या काही दिवसापासून शाहू महाराज यांना कोल्हापूर मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याचे संकेत मिळत आहेत. त्यांनीही नुकतेच शुभचिन्ह असलेली तुतारी लवकरच सगळीकडे वाजेल, असे म्हणत उमेदवारी बाबत एक संकेत दिला होता. तर आज त्याच्या पुढे जात वरील प्रमाणे विधान केले.

हेही वाचा >>>सुळकुड बंधाऱ्यावरील महिलांचे उपोषण मागे; दूधगंगा पाणी प्रश्नी मंत्रालयात बैठकीचे आयोजन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ते म्हणाले , खरे तर ही केवळ ब्रेकिंग नसेल तर जबाबदारीची गोष्ट असेल. आतापर्यंत आपण सर्वजण वेगवेगळे प्रश्न सोडवत राहिलो आहे.आता त्याला आणखी गती येईल. महत्त्वाचे प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडवावे लागतील. त्यासाठी आपणा सर्वांचे मार्गदर्शन अपेक्षित आहे. चांगल्या वातावरणामध्ये काम करत राहू , असे म्हणत त्यांनी निवडून आल्यावर कामाचा अजेंडा काय असेल, यावरही भाष्य केले.