कोल्हापूर : कोल्हापूर शहरात ४ अनधिकृत होर्डिंग असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने काल दिली होती. पण रातोरात त्याची संख्या वाढण्याचा प्रकार घडला आहे. महापालिकेने बुधवारी राबवलेल्या मोहिमेत १७ अनधिकृत होर्डिंग हटवल्याचा दावा केला आहे. त्यामुळे अनधिकृत होल्डिंगची संख्या नेमकी किती याबाबतचा संभ्रम शहरवासीयांमध्ये निर्माण झाला आहे.

कोल्हापूर शहर हद्दीतील विना परवाना, अनाधिकृत १७ होर्डींगधारकांना आज महापालिकेच्यावतीने तात्काळ होर्डीग्ज् काढणेबाबत नोटीसा लागू करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील तरतुदीनुसार व मालमत्तेच्या विद्रुपीकरण प्रतिबंध अधिनियम १९९५ नुसार शहरातील होर्डींग्जधारकांना सदरची होर्डिंग्ज विनापरवाना असलेने ते तात्काळ काढून घेणेबाबत कळविले आहे. सदरची होर्डींग्ज मुदतीत काढली नाहीत तर विनापरवाना, अनाधिकृत जाहिरात केलेबद्दल कारवाई करण्याची नोटीस देण्यात आली आहे.

हेही वाचा : आंदोलनानंतर कोल्हापूर महापालिकेला जाग; ३० मे पूर्वी केवळ पाच रस्ते पूर्ण करण्याचे ठेकेदारास आदेश

महापालिकेच्यावतीने कोल्हापूर शहरामध्ये मान्सुन पुर्व करण्यात येणाऱ्या उपाय योजनेच्या अनुषंगाने व घाटकोपर येथे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व होर्डिंग्जची तपासणी व अनाधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्याचे आदेश प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी दिले होते. त्याप्रमाणे शहरांतर्गत लावणेत आलेल्या जाहिरात होर्डिंग सुरक्षेबाबत उपायुक्त साधना पाटील यांनी होर्डिंग असोसिएशनचे पदाधिकारी व होर्डिंगधारक यांच्या समवेत महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील बैठक घेतली होती.

या बैठकीमध्ये चर्चेनुसार आज हॉकी स्टेडीयम येथील दोन होर्डींग्ज, शाहू टोल नाका येथील एक होर्डींग, शाहू टोल नाका उड्डाण पूल पश्चिम बाजू येथील पाच होर्डींग्ज, जोतिबा हॉटेल कॉर्नर मार्केटयार्ड रोड येथील एक होर्डींग, रूईकर कॉलनी लिशा हॉटेल जवळील एक होर्डींग, दसरा चौक येथील साधना हॉटेल जवळील दोन होर्डींग्ज, कसबा बावडा भारत पेट्रोल पंप येथील एक होर्डींग, कसबा बावडा शिये रोड हॉटेल गोल्डन कॉईन येथील एक होर्डींग, श्री मंगल कार्यालय येथील एक होर्डींग, हॉटेल रेणुका येथील एक होर्डींग, इंडीयन ऑईल पेट्रोल पंप येथील एक होर्डींग धारकांना नोटीसा लागू करण्यात आल्या.

हेही वाचा : कोल्हापूर: चंद्राबाबू नायडू उद्या महालक्ष्मी, साईबाबाच्या चरणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महापालिकेच्या इस्टेट विभागाने या सर्व परिसरातील १७ विनापरवाना, अनाधिकृत होर्डींग्जधारकांना या नोटीसा लागू केल्या आहेत. तसेच मार्केटयार्ड वाळू अड्डा येथील एक होर्डींग व मार्केटयार्ड रोड वरील राजमुद्रा मटका मिसळ यांचे एक होर्डींग आज निष्काशित करुन ते काढून टाकले आहेत. ही कारवाई अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उप-आयुक्त साधना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इस्टेट ऑफिसर विलास साळोखे व इस्टेट विभागातील कर्मचा-यांनी केली.