कोल्हापूर : शिवसेनेचे राज्यमंत्री, एक आमदार हे एकनाथ शिंदे गटाला मिळाले असताना कोल्हापुरातील शिवसेनेचा आणखी बडा एक नेता त्यांच्या गळाला लागल्याचे वृत्त आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष. माजी आमदार राजेश क्षीरसागर हे गुरुवारी दुपारपासून संपर्कहीन झाले आहेत. त्यांनी शिंदे यांची पाठराखण करण्याचे ठरवले असल्याचे सांगण्यात येते.

 सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर व आमदार प्रकाश आबिटकर हे शिंदे यांच्या समवेत गोहत्ती येथे आहेत. आता माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनीही शिंदे यांच्यासोबत राहण्याचे ठरवले आहे.

शिवसेनेला आणखी एक धक्का

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 त्यांनी प्रमुख कार्यकर्त्यांची आज बैठक घेतली. त्यामध्ये उद्धव ठाकरे हे माझे दैवत आहेत आणि एकनाथ शिंदे गुरु आहेत. राज्यतील राजकीय परिस्थिती पाहता माझी अवस्था चक्रव्युहात अडकल्या सारखी झाली आहे. तो भेदण्यासाठी काही निर्णय घेणे गरजेचे आहे, असेही त्यांनी नमूद केले होते, त्यानंतर ते दुपारी आसाम कडे रवाना झाल्याचे सांगण्यात येते. शिवसेनेने उद्या उद्धव ठाकरे यांच्या समर्थनात फेरी काढण्याचा निर्णय घेतला असताना त्याच्या पूर्वसंध्येला शिवसेनेला आणखी एक धक्का मिळाला आहे.