कोल्हापूर : राज्य शासनाचा १५ मार्च २०२४ रोजीचा संचमान्यतेच्या अध्यादेश रद्द करावा या मागणीसाठी येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघातर्फे आंदोलन करण्यात आले. शेकडो शिक्षकांनी संचमान्यतेचा आदेश मागे घेत नाही तोपर्यंत राहण्याचा निर्धार यक्त केला. येथील जिल्हा परिषदेसमोर दुपारी दोन ते चार या वेळेत धरण आंदोलन झाले. या आंदोलनात जिल्ह्यातील शिक्षक उतरले. प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारले. शिक्षकांच्या मागण्यांचे निवेदन पुणे संचालक कार्यालयाकडे पाठवित असल्याचे शेंडकर यांनी सांगितले.
संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष विलास चौगुले, जिल्हाध्यक्ष रवी कुमार पाटील, सरचिटणीस सुनील पाटील जिल्हा नेते रघुनाथ खोत यांचे नेतृत्वाखाली यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. सकारात्मक निर्णय घेतला नाही तर आंदोलनाची तीव्रता आणखी वाढवू ’असा इशारा दिला.