कोल्हापूर : सुषमा अंधारे, हातकणंगलेचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी राजकिय डावपेच रचले. त्याचा परिणाम म्हणून मला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पदावरून कमी केले ,असा आरोप मावळते अध्यक्ष मुरलीधर जाधव यांनी पत्रकार परिषद केला. तर, तर, कार्यकारिणीतील बदलांमध्ये उद्धव ठाकरे यांचा सहभाग नाही, असा निर्वाळा देतानाच त्यांनी ठाकरे सेनेमध्येच राहणार असल्याचेही स्पष्ट केले.

कोल्हापूर जिल्हा ठाकरे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष पदावर मुरलीधर जाधव यांना हटवण्यात आले आहे. या नंतर आज जाधव यांनी आपली भूमिका पत्रकार परिषदेत मांडली. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. जाधव यांना पदावरून काढल्याच्या निषेधार्थ हातकणंगले तालुका अध्यक्ष यांनी राजीनामा दिला आहे.

हेही वाचा >>> हातकणंगलेत गतवेळचीच लढत नव्या राजकीय रंगढंगात

एमआयडीसी जमीन घोटाळा

कागल – हातकनंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये धैर्यशील माने टेक्स्टाईल पार्क आहे.त्यासाठी एमआयडीसीने ६७ एकर जमीन देऊ केली आहे. या प्रकल्पाला केंद्र शासनाचा पूर्ण निधी मिळाला आहे. मात्र हा निधी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब देशमुख, उपाध्यक्ष नंदू जाजू यांनी गैरप्रकारे खर्च केला आहे

तरीही या प्रकल्पाची जमीन हस्तांतरित करण्याची बेकायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. यासाठी सुजित मिणचेकर यांचा हात आहे. एमआयडीसी जमीन घोटाळा करणारी मिणचेकर यांची टोळी कार्यरत आहे. त्यामध्ये अधिकारी सामील आहेत. ते मिणचेकर यांच्या पार्टीत सहभागी होऊन गाणी म्हणत असतात,अशी खळबळजनक माहिती जाधव यांनी यावेळी केला.

हेही वाचा >>> कोल्हापुरातील पाटील – महाडिक यांचे राजकारण सूडाच्या हिंसक वळणावर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेट्टींना विरोध कायम

ठाकरे सेनेच्या वतीने हातकणंगले लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे सेनेकडून राजू शेट्टी यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. यावर चार दिवसापूर्वी मुरलीधर जाधव यांनी सतत राजकीय भूमिका बदलणाऱ्या शेट्टी यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी केली होती. याच मागणीचा पुनरुच्चार त्यांनी आज केला. शिवसेनेने आतापर्यंत रघुनाथदादा पाटील, संजय पाटील ,धैर्यशील माने असे उमेदवार आयात केले.  धैर्यशील माने हे तर पक्षाकडून निवडून येऊन पक्ष सोडून गेले. यावेळी इंडिया आघाडी – महाविकास आघाडीला अनुकूल वातावरन असल्याने कट्टर शिवसैनिकाला उमेदवारी दिल्यास तो निश्चितपणे निवडून येईल, असा दावा जाधव यांनी केला.