कोल्हापूर : पेन तथा लेखणी. हिचे सामर्थ्य किती हे सांगणारे वर्णने साहित्यात अनेक ठिकाणी आढळतात . किंबहुना क्रांती होण्यास, देशांचा स्वातंत्र्याला पुढे जाण्यास लेखणी कारणीभूत ठरल्याचा उल्लेख अनेक ठिकाणी आला आहे. पण अशी ही लेखणी तथा पेन किती वेगवेगळ्या रंगा- रूपात असतो हे अनुभवण्याची अनोखी संधी कोल्हापुरात मिळाली आहे. येथे दोनशे रुपये पासून ते चक्क लाखो रुपये किमतीचे अनेकानेक पेन पाहून थक्क व्हायला होते.

कसे आहे हे जग याचा हा धांडोळा. जगभरातील पन्नास हून अधिक नामांकित ब्रँडच्या पेनाचे प्रदर्शन सध्या कोल्हापुरात भरले असून या प्रदर्शनात २०० रुपयांपासून ते ७ लाख रुपयापर्यंतच्या विविध आकाराचे पेन आणि दुर्मिळ शाई पाहण्यासाठी आणि खरेदीसाठी उपलब्ध झाले आहेत.

आणखी वाचा-राजापूर बंधारा ओसंडून वाहण्याच्या होण्याच्या मार्गावर; बंधाऱ्यावर कडक पोलिस बंदोबस्त

दुर्मिळ पेनांची अनोखी दुनिया

सुरुवातीच्या काळात पक्षांच्या पिसाऱ्यांपासून या पेनांचा सुरू झालेला प्रवास हा आज शाई पेन, बॉल पेन, जेल पेन ते अगदी डिजिटल पेन पर्यंत येऊन पोहोचला आहे. असे असले तरी शाई पेन प्रती पेन चाहात्यांचं असलेलं आकर्षण हे अद्याप कमी झालेलं नाही. अनेक मोठ्या प्रसंगी किंवा सुंदर हस्ताक्षरासाठी शाई पेनचा वापर अनेक जण करतात. यामुळे पेन चाहत्यांना विविध पेन आणि या पेनांचा प्रवास माहित व्हावा यासाठी कोल्हापुरातील हॉटेल सयाजी येथे बॉब अँड ची या संस्थेच्या वतीने हे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनात जगभरातील पन्नासहून अधिक नामांकित ब्रँडच्या तब्बल दोन हजार हून अधिक फॉऊंटन पेन, रोलर पेन, बॉल पेन, मेकनाईज्ड पेन्सिल्स आणि उच्च दर्जाची दुर्मिळ शाई चा समावेश असून यासोबतच पेन ठेवण्यासाठी लागणारे उच्च दर्जाचे खास पाऊस आणि केसेस ही येथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या प्रदर्शनात पटना बिहार येथील पेन संग्राहक तसेच पेन विश्वातील जाणकार युसूफ मन्सूर यांनी संग्रहित केलेले तब्बल सव्वाशे वर्षांपूर्वी पासूनचे पेन हे पेन चाहत्यांचे आकर्षण बिंदू ठरत आहेत.

आणखी वाचा-शक्तिपीठ महामार्ग प्रश्न पुन्हा तापला; कोल्हापुरात १८ जूनला विराट मोर्चाचा संघर्ष समितीच्या बैठकीत निर्णय

इटलीतील सात लाखाची लेखणी

या पेन प्रदर्शनात सर्वाधिक आकर्षित करणारा पेन हा इटली येथे तयार झालेला सात लाख रुपये किमतीचा पेन असून त्याचे चार प्रकारचे विविध डिझाईन पेन चाहत्यांना पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. पूर्णपणे हाताने तयार केलेल्या या पेनाची नीब ही सोन्याची आहे. हा पेन इटली येथील प्रसिद्ध कवी पॅराडाईस यांच्या जीवनावर हे पेन तयार करण्यात आले असून जगात केवळ ३३३ अशा पद्धतीचे पेन तयार करण्यात आले असून भारतात १५ पेन विक्रीसाठी उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे हा पेन पाहून कोल्हापुरातील एका पेन चहात्याने हा पेन खरेदी केला आहे. तसेच या पेन साठी लागणारी शाई देखील येथे पाहायला मिळत आहे.

तसेच किल्ल्यांचे डिझाईन केलेले, तांबा धातू पासून तयार केलेले पेन देखील येथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तर पु ल देशपांडे, डॉ ए पी जे अब्दुल कलाम, डॉ बाबासाहेब आंबेडकर सिग्नेचर फाउंटन पेन, छत्रपती शिवाजी महाराज पेन व लहान मुलांसाठी चिंटू चे पेन खरेदीसाठी पेन चाहते गर्दी करत आहेत. तसेच बुलढाणा येथील हस्ताक्षर कलाकार गोपाल वाकोडे हे मराठीतून वेगवेगळ्या नावांचे वैविध्यपूर्ण स्वाक्षरी तयार करून घेत आहेत.