कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातील नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या विरोधात कागल तालुक्यात गुन्हा दाखल झाला आहे. कागल येथील विवेक कुलकर्णी व अन्य ज्या १६ लोकांनी मुरगुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक घोटाळ्याचे आरोप चालवले आहेत. त्यावरून प्राप्तिकर विभाग, ईडी यांनी मुश्रीफ यांच्या  घरावर छापे टाकले होते. तर दोन दिवसांपूर्वी सोमय्या कोल्हापुरात आले होते. तेव्हा कागल तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी मुश्रीफ यांनी आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार सोमय्या यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. यानंतर मुश्रीफ यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला आहे.

सूडबुद्धीतून गुन्हा दाखल केल्याची टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान , आमदार हसन साहेब यांच्यावर दाखल झालेला गुन्हा हा राजकीय सूडबुद्धीतूनच दाखल केला आहे , अशी टीका मुश्रीफ समर्थकांनी केल आहे. ही निखालास खोटी व राजकीय दबावापोटी दिलेली तक्रार आहे. ही तक्रार कोणाच्या सांगण्यावरून झालेली आहे, हे जग जाहिरच आहे.  जनता या कुणालाही माफ करणार नाही.राजकीय द्वेषापोटी शेतकऱ्यांचा गळा घोटू नका, अशी समज देणारे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुखांनी दिले आहे.  गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या या षडयंत्रामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडेल याची  कोणतीही चौकशी व शहानिशा न करता दाखल केलेल्या या गुन्ह्यामुळे याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील, असेही समर्थकांनी पत्रकात म्हटले आहे.