फुलेवाडी-बोद्रेनगर रिंग रोडवरील एका सराफी दुकाचे शटर उचकटून आठ लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. तर घराचा कडीकोयंडा उचकटून चोरीचा प्रयत्न केला. मात्र घरातील लोक बाहेरगावी गेले असल्याने चोरीच्या मालाचा तपशील समजू शकला नाही. रविवारी हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
[jwplayer MhHQBjRD]
फुलेवाडी-बोद्रेनगर रिंग रोडवर नीलेश देसाई यांचा ‘रत्न सावली’ नावाचा बंगला आहे. खाजगी फायनान्स कंपनीमध्ये ते कामाला आहेत. त्यांच्या एका गाळ्यामध्ये सुशांत पोवार यांचे श्री ज्वेलर्स हे सराफी दुकान आहे.
देसाई हे आठ दिवसांपूर्वी कुटुंबीयासह पर्यटनासाठी गेले आहेत. पोवार हे रात्री नऊच्या सुमारास सराफी दुकान बंद करून घरी गेले होते. रविवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना दुकानाचे शटर उचकटल्याचे दिसून आले. त्यांनी आत जाऊन पाहिले असता सहा तोळे सोन्याच्या दागिन्यासह एक किलो चांदी चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. त्यांनी आजूबाजूला चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता देसाई यांच्या बंद घराचा कडीकोयंडाही उचकटला असल्याचे त्यांना दिसून आले. देसाई यांच्या घरातील हॉल आणि बेडरूममधील कपाटातील साहित्य विस्कटले असल्याचे दिसून आले. काहींनी दूरध्वनीद्वारे या चोरीची माहिती देसाई यांना दिली.
पोवार यांनी करवीर पोलीस ठाण्यात आठ लाख रुपये किमतीचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली आहे. करवीर पोलिसांनी परिसरातील क्लोज सíकट कॅमेराच्या मदतीने संशयितांचा शोध सुरू आहे.
[jwplayer Kr2xSS1C]