महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या उपसमितीवर कोल्हापुरातील सात जणांची वर्णी लागली आहे. संग्राम अतितकर यांच्याकडे महाराष्ट्र रणजी संघाच्या निवड समितीचे अध्यक्षपद सोपवण्यात आले आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने सन २०२३ या हंगामासाठी उपसमितीची शुक्रवारी घोषणा केली आहे. यामध्ये कोल्हापूरला प्रथमच मोठी संधी मिळालेली आहे. अतितकर यांच्याशिवाय आणखी सहा जणांवर महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
हेही वाचा- “…तेव्हा लोक वेड्यात काढायचे”, देवेंद्र फडणवीसांनी सांगितला ‘तो’ अनुभव; म्हणाले, “हा एक रस्ता…!”
माजी भारतीय कसोटी व एकदिवशीय महिला खेळाडू अमॄता शिंदे यांची महाराष्ट्र १५ वर्षाखालील महिला संघ निवड समितीच्या अध्यक्षपदी, माजी रणजी खेळाडू अतुल गायकवाड यांची १९ वर्षाखालील महाराष्ट्र संघ व्यवस्थापक पदी, माजी रणजी खेळाडू व कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन कनिष्ठ निवड समितीचे सदस्य शैलेश भोसले यांची यांची १९ वर्षाखालील महाराष्ट्र संघ निवड समितीच्या सदस्य पदी, कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव केदार गयावळ यांची महाराष्ट्र स्पर्धा कमिटी सदस्य पदी, कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे खजानिस अभिजीत भोसले यांची व माजी महाराष्ट्र महिला संघाची खेळाडू चंदाराणी कांबळे यांची महाराष्ट्र १९ वर्षाखालील व खुला गट महिला संघाच्या संघव्यवस्थापक पदी निवड झाली आहे.
