कोल्हापूर : राज्य शासन कोणत्याच बाबतीत गंभीर नाही. अगदी मुख्यमंत्र्यांची सभा उधळून लावू असा वारंवार इशारा देऊनही उसाची एफआरपी आणि प्रतिटन ४०० रुपये देण्याच्या मागणीकडे शासन दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे राज्य सरकार बेजबाबदार काम करत आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी बुधवारी येथे केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने एफआरपी अधिक ४०० रुपये इतकी रक्कम प्रतिटन मिळाली पाहिजे, या मागणीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा कोल्हापुरातील प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये हजारो शेतकऱ्यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी पत्रकारांशी बोलताना राजू शेट्टी यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या गळीत हंगामासाठी एफआरपी अधिक चारशे रुपये इतकी रक्कम दिवाळीपूर्वी मिळाली पाहिजे, अन्यथा साखर कारखान्यांची धुराडी पेटवू देणार नाही, असा इशारा दिला. हेही वाचा - कोल्हापूर लोकसभेच्या दोन्ही जागा भाजपच जिंकेल – चंद्रकांत पाटील हेही वाचा - कोल्हापूर: विश्व हिंदू परिषद संघटन, सेवा क्षेत्राचा देश- विदेशात विस्तार करणार ;महामंत्री मिलिंद परांडे मुळात आमची ही मागणी नवीन नाही. गतवर्षी जयसिंगपूर येथे ऊस परिषद झाली असता एफआरपी ताबडतोब १५ दिवसांत हंगाम संपल्यानंतर, प्रतिटन २०० रुपये आणि वर्षभरात साखरेचे दर पाहून उर्वरित रक्कम मिळावी, अशी मागणी केली होती. त्यानुसारच आता आम्ही ही रक्कम मागत आहोत. ती दिली नाही तर आगामी ऊस गळीत हंगामात शेतकऱ्यांना संघर्षाची भूमिका घेणे भाग पडेल, असा इशाराही त्यांनी दिला.