कोल्हापूर : पूरस्थिती असलेल्या कोल्हापूरात रविवारी पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ नागरिकांवर आली. पाण्याच्या टाकीचे काम सुरू असल्याने निम्मे कोल्हापूर आज तहानलेले राहिले. टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यावर प्रशासन समाधानी राहिली.
कोल्हापूरातील साळोखे नगर येथील पाण्याच्या टाकीचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे अर्ध्या कोल्हापुरात पाणी पुरवठा खंडित होणार असल्याचे सांगण्यात आले होते. यामुळे आज कोल्हापूरकरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागली. टँकरद्वारे पाणीपुरवठा करून अल्प प्रमाणात तहान भागवण्यावर प्रशासनाचा भर आहे.
कोल्हापुरात गणेश उत्सवाच्या तयारीचे काम सुरू असतानाच पाणी पुरवठा खंडित करून यावर कोल्हापूर महापालिकेने विघ्न निर्माण केले. यामध्ये संपूर्ण ए, बी वॉर्डातील पुईखडी परिसर, कलिकते नगर, सुलोचना पार्क परिसर , इंगवले कॉलनी परिसर, नाना पाटील नगर, आपटेनगर, कणेरकरनगर, सानेगुरूजी वसाहत, राजोपाध्येनगर, बिडी कॉलनी, हिंदु कॉलनी, म्हाडा कॉलनी, शिवगंगा कॉलनी, वाल्मीकी वसाहत, जिवबा नाना परिसर, बापूरामनगर परिसर , साळोखेनगर परिसर, राजीव गांधी वसाहत, कात्यायणी कॉम्ल्पलेस, तपोवन परिसर, देवकर पाणंद परिसर, मोरे माने नगर परिसर,संभाजीनगर स्टँड परिसर, नाळे कॉलनी, रामानंद नगर, बालाजी पार्क, शाहू कॉलनी परिसर, सासणे कॉलनी, रायगड कॉलनी परिसर, जरगनगर, सुभाषनगर, शेंडापार्क परिसर, आर.के.नगर, भारती विद्यापीठ, म्हाडा कॉलनी परिसर, संभाजीनगर परिसर, गंजीमाळ परिसर, शिवाजी पेठ परिसर, राजकपूर पुतळा परिसर, मंगळवार पेठ परिसर, पोतणीस बोळ परिसर, मंगेशकर नगर, बेलबाग परिसर, महालक्ष्मीनगर, सरनाईक वसाहत, त्रिकोणे गॅरेज परिसर, नेहरूनगर, वाय.पी.पोवार नगर, जवाहर नगर परिसर व संलग्नीत ग्रामीण भागा तील लोकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागली.