इंग्लंडविरुद्ध भारत अशी कसोटी मालिका सध्या इंग्लंडमध्ये सुरु आहे. या मालिकेत दोनही संघाच्या खेळाडूंकडून अनेक झेल सोडण्यात आले आहेत. पण भारताचा डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेल याने इंग्लिश काउंटी एक झेल पकडून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. वॉरविकशायरविरुद्धच्या सामन्यात अक्षरने रॉयन साइटबॉटमचा मिळवलेला बळी बघण्यासारखाच आहे. हा झेल पाहून प्रेक्षकही थक्क झाले. तसेच हा व्हिडिओ पाहताना दर्शकदेखील अवाक झाल्याशिवाय राहात नाहीत.

या सामन्यात फलंदाजाने चेंडू शॉर्ट-लेगच्या खेळाडूच्या दिशेने मारला. मात्र तो त्याच्या हेल्मेटला लागून उडला आणि थेट अक्षरच्या हाती येऊन विसावला. इंग्लिश काउंटीमध्ये त्याने घेतलेल्या या झेलाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. वॉरविकशायरविरुद्धच्या सामन्यात अक्षरने रॉयन साइटबॉटमचा झेल घेतला.

अक्षरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. काउंटी चॅम्पिननशीपने हा व्हिडिओ ट्विट केला आहे. यावर नेटकाऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, वॉरविकशायरविरुद्ध झालेल्या एका सामन्यात अक्षरने ९ बळी मिळवत २२ धावा दिल्या होत्या. यावेळी त्याने सामन्याच्या तिसऱ्या डावात ७ बळीही घेतले.