News Flash

Ind vs Aus : यहाँ के हम सिकंदर ! रोहित-विराटच्या झंझावातासमोर कांगारुंची शरणागती

७ गडी राखून जिंकला सामना, मालिकेतही २-१ ने बाजी

सलामीवीर रोहित शर्माचं धडाकेबाज शतक आणि कर्णधार विराट कोहलीच्या झंजावाती अर्धशतकी खेळाच्या जोरावर भारताने अखेरच्या वन-डे सामन्यात विजय मिळवत मालिकेत २-१ ने बाजी मारली आहे. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेलं २८७ धावांचं आव्हान भारताने २ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची धुलाई करत मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. रोहित शर्माने ११९ तर कर्णधार विराट कोहलीने ८९ धावा केल्या. ७ गडी राखून भारताने अखेरचा सामना जिंकला.

अखेरच्या सामन्यात भारतीय डावाची सुरुवातही चांगली झाली. रोहित शर्मा आणि लोकेश राहुलने पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत आपले इरादे स्पष्ट केले. लोकेश राहुल माघारी परतल्यानंतर विराट आणि रोहित जोडीने अक्षरशः कांगारुंच्या नाकीनऊ आणले. प्रत्येक गोलंदाजांवर हल्लाबोल करत भारतीय फलंदाजांनी धावांचा ओघ सुरुच ठेवला. रोहित शर्माने यादरम्यान आपलं शतकंही साजरं केलं. रोहित-विराट जोडी भारताला विजय मिळवून देणार असं वाटत असताना रोहित झॅम्पाच्या गोलंदाजीवर माघारी परतला.

यानंतर विराटने श्रेयस अय्यरच्यासाथीने तुफान फटकेबाजी करत भारताला विजयाच्या जवळ आणलं. मात्र आपलं शतक पूर्ण करणं त्याला जमलं नाही. ८९ धावांवर असताना हेजलवूडच्या गोलंदाजीवर विराट त्रिफळाचीत झाला. यानंतर श्रेयस अय्यर आणि मनिष पांडे जोडीने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज अखेरच्या सामन्यात भारतावर अंकुश लावण्यात अपयशी ठरले.

त्याआधी, स्टिव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन या फलंदाजांनी केलेल्या आश्वासक खेळामुळे कांगारुंनी अखेरच्या वन-डे सामन्यात २८६ धावांपर्यंत मजल मारली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंचचा निर्णय पुरता चुकला. भारतीय गोलंदाजांनी पहिल्या षटकापासून भेदक मारा करत कांगारुंच्या धावगतीवर अंकुश लावला. मात्र स्मिथ आणि लाबुशेनच्या महत्वपूर्ण भागीदारीमुळे कांगारुंनी सन्मानजनक धावसंख्या गाठली.

अवश्य वाचा – Ind vs Aus : कांगारुंच्या शेपटावर शमीचा पाय, ४ बळी घेत दिग्गजांना टाकलं मागे

सलग दुसऱ्या सामन्यात डेव्हिड वॉर्नरला झटपट माघारी धाडण्यात भारताला यश आलं. यापाठोपाठ कर्णधार फिंचही चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात माघारी परतला. यानंतर लाबुशेन आणि स्मिथने तिसऱ्या विकेटसाठी १२७ धावा जोडल्या. ही जोडी कांगारुंना मोठी धावसंख्या उभारुन देणार असं वाटत असतानाच जाडेजाने लाबुशेनला माघारी धाडलं. त्याने ५४ धावा केल्या. यानंतर स्मिथने यष्टीरक्षक कॅरीला सोबतीला घेत संघाला २०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. दोन्ही फलंदाजांनी अर्धशतकी भागीदारी करत डावाला पुन्हा एकदा स्थैर्य दिलं.

यादरम्यान स्मिथने आपलं शतकही पूर्ण केलं. कॅरी आणि टर्नर अखेरच्या षटकांमध्ये ठराविक अंतराने माघारी परतले. यानंतर स्मिथनेही फटकेबाजी करत संघाला २५० धावांचा टप्पा ओलांडून दिला. मात्र शमीच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो देखील बाद झाला. त्याने १३१ धावांची खेळी केली. अखेरीस तळातल्या फलंदाजांनी फटकेबाजी करत कांगारुंना २८६ या सन्मानजनक धावसंख्येपर्यंत आणलं. भारताकडून मोहम्मद शमीने ४, रविंद्र जाडेजाने २ तर नवदीप सैनी आणि कुलदीप यादवने प्रत्येकी १-१ बळी घेतला.

लोकसत्ता समालोचन
Live Blog
Highlights
 • 16:30 (IST)

  स्मिथ-कॅरी जोडीने कांगारुंना ओलांडून दिला २०० धावांचा टप्पा

  सलग दुसऱ्या सामन्यात स्मिथची आश्वासक फलंदाजी

 • 15:46 (IST)

  अर्धशतकी खेळीनंतर लाबुशेन माघारी, कांगारुंना तिसरा धक्का

  रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर कर्णधार विराट कोहलीने घेतला झेल, लाबुशेनच्या ५४ धावा

 • 15:24 (IST)

  स्टिव्ह स्मिथचं अर्धशतक, कांगारुंची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल

  स्मिथ - लाबुशेन जोडीकडून भारतीय गोलंदाजांचा नेटाने सामना, ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला

 • 14:19 (IST)

  ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का, कर्णधार फिंच धावबाद

  मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात फिंच-स्मिथमध्ये गोंधळ

  अखेरीस कर्णधार फिंच धावबाद होऊन माघारी, कांगारुंना दुसरा धक्का, ओलांडला ५० धावसंख्येचा टप्पा

 • 13:49 (IST)

  ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का, डेव्हिड वॉर्नर माघारी

  महत्वाच्या सामन्यात आपली छाप पाडण्यात वॉर्नर अपयशी

  टप्पा पडून बाहेर जाणारा चेंडू खेळावा की न खेळावा या द्वंद्वात चेंडू वॉर्नरच्या बॅटची कड घेऊन यष्टीरक्षक राहुलच्या हातात

  मोहम्मद शमीने घेतला वॉर्नरचा बळी

21:06 (IST)19 Jan 2020
मनिष पांडेकडून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब

७ गडी राखत भारत विजयी, मालिकेतही २-१ ने मारली बाजी

20:56 (IST)19 Jan 2020
कर्णधार विराट कोहलीचं शतक हुकलं, भारताचा तिसरा गडी माघारी

८९ धावा काढत विराट बाद, हेजलवूडने उडवला त्रिफळा

20:16 (IST)19 Jan 2020
शतकवीर रोहित शर्मा माघारी, भारताला दुसरा धक्का

झॅम्पाच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळताना स्टार्कने घेतला रोहितचा झेल

१२८ चेंडूत ८ चौकार आणि ६ षटकारांसह रोहितच्या ११९ धावा

20:15 (IST)19 Jan 2020
कर्णधार विराट कोहलीचंही अर्धशतक, भारत भक्कम स्थितीत

रोहित-विराटच्या भागीदारीमुळे भारताने ओलांडला द्विशतकी टप्पा

19:43 (IST)19 Jan 2020
विराट-रोहित जोडीची महत्वपूर्ण भागीदारी, रोहितने झळकावलं शतक

भारतीय संघाची विजयाच्या दिशेने वाटचाल, वन-डे कारकिर्दीतलं रोहितलं २९ वं शतक

18:51 (IST)19 Jan 2020
रोहित शर्माचं अर्धशतक

विराटच्या साथीने रोहितची झुंज सुरुच

18:45 (IST)19 Jan 2020
लोकेश राहुल माघारी, भारताला पहिला धक्का

फिरकीपटू अगरच्या गोलंदाजीवर राहुल पायचीत

18:43 (IST)19 Jan 2020
भारतीय सलामीवीरांची आश्वासक सुरुवात

रोहित शर्मा - शिखर धवन जोडीची पहिल्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी

17:18 (IST)19 Jan 2020
कांगारुंची २८६ धावांपर्यंत मजल

भारताला विजयासाठी २८७ धावांचं आव्हान

17:12 (IST)19 Jan 2020
अखेरच्या षटकात झॅम्पा माघारी

मोहम्मद शमीने उडवला त्रिफळा

17:03 (IST)19 Jan 2020
त्याच षटकात पॅट कमिन्स माघारी, कांगारुंना आठवा धक्का

मोहम्मद शमीने उडवला कमिन्सचा त्रिफळा, भारताचं पुनरागमन

17:02 (IST)19 Jan 2020
शतकवीर स्टिव्ह स्मिथ माघारी, कांगारुंना सातवा धक्का

मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर श्रेयस अय्यरने घेतला झेल

१३२ चेंडूत १४ चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने स्मिथच्या १३१ धावा

16:43 (IST)19 Jan 2020
कांगारुंना सहावा धक्का, टर्नर बाद

नवदीप सैनीच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक राहुलने घेतला झेल 

16:42 (IST)19 Jan 2020
स्टिव्ह स्मिथचं शतक, ऑस्ट्रेलियाची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल

भारतीय गोलंदाजांचा नेटाने सामना करत स्मिथचं शतक

16:30 (IST)19 Jan 2020
कॅरी बाद, कांगारुंना पाचवा धक्का

कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर श्रेयस अय्यरने घेतला झेल

16:30 (IST)19 Jan 2020
स्मिथ-कॅरी जोडीने कांगारुंना ओलांडून दिला २०० धावांचा टप्पा

सलग दुसऱ्या सामन्यात स्मिथची आश्वासक फलंदाजी

15:49 (IST)19 Jan 2020
त्याच षटकात कांगारुंना चौथा धक्का, मिचेल स्टार्क बाद

रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात, स्टार्क भोपळाही न फोडता माघारी

15:46 (IST)19 Jan 2020
अर्धशतकी खेळीनंतर लाबुशेन माघारी, कांगारुंना तिसरा धक्का

रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर कर्णधार विराट कोहलीने घेतला झेल, लाबुशेनच्या ५४ धावा

15:45 (IST)19 Jan 2020
स्मिथपाठोपाठ लाबुशेनचंही अर्धशतक

ऑस्ट्रेलिया भक्कम स्थितीत

15:24 (IST)19 Jan 2020
स्टिव्ह स्मिथचं अर्धशतक, कांगारुंची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल

स्मिथ - लाबुशेन जोडीकडून भारतीय गोलंदाजांचा नेटाने सामना, ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला

15:01 (IST)19 Jan 2020
ऑस्ट्रेलियाने ओलांडला शतकी धावसंख्येचा टप्पा

स्टिव्ह स्मिथ आणि लाबुशेनची संयमी भागीदारी, कांगारुंची झुंज सुरुच

14:19 (IST)19 Jan 2020
ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का, कर्णधार फिंच धावबाद

मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात फिंच-स्मिथमध्ये गोंधळ

अखेरीस कर्णधार फिंच धावबाद होऊन माघारी, कांगारुंना दुसरा धक्का, ओलांडला ५० धावसंख्येचा टप्पा

13:49 (IST)19 Jan 2020
ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का, डेव्हिड वॉर्नर माघारी

महत्वाच्या सामन्यात आपली छाप पाडण्यात वॉर्नर अपयशी

टप्पा पडून बाहेर जाणारा चेंडू खेळावा की न खेळावा या द्वंद्वात चेंडू वॉर्नरच्या बॅटची कड घेऊन यष्टीरक्षक राहुलच्या हातात

मोहम्मद शमीने घेतला वॉर्नरचा बळी

13:12 (IST)19 Jan 2020
भारतीय संघात कोणतेही बदल नाहीत...
https://platform.twitter.com/widgets.js
13:10 (IST)19 Jan 2020
असा असेल ऑस्ट्रेलियाचा अंतिम ११ जणांचा संघ...
https://platform.twitter.com/widgets.js
13:10 (IST)19 Jan 2020
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

अंतिम सामन्यात कांगारुंच्या संघात एक बदल

केन रिचर्डसनच्या जागी जोश हेजलवूडला संधी

12:43 (IST)19 Jan 2020
अंतिम सामन्यात कोणाचं पारडं असेल जड?? जाणून घ्या काय सांगते आकडेवारी...
टॅग : Ind Vs Aus
Next Stories
1 झोप उडवणारी घटना : भारताचा आघाडीचा गोलंदाज डिप्रेशनमुळे करणार होता आत्महत्या
2 Mumbai Marathon 2020 : १७व्या मुंबई मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद
3 Ind vs Aus : आज बेंगळूरुत सत्तासंघर्ष!
Just Now!
X