News Flash

बुमराहच्या लग्नाला एक महिना पूर्ण; संजनासाठी केली स्पेशल पोस्ट

पत्नी संजनासाठी बुमराहचा खास संदेश

भारतीय क्रिकेटपटू जसप्रीत बुमराहच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला आहे. संजना गणेशनसोबत १५ मार्चला गोव्यात जसप्रीत बुमराह लग्नबेडीत अडकला होता. आता महिनापूर्तीनंतर बुमराहने लग्नातील काही फोटोज शेअर केले आहेत. त्या फोटोला त्याने कॅपशनही दिलं आहे. या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव सुरु केला आहे.

‘एक महिन्याचं प्रेम, पोट दुखेपर्यंत हसणं, खराब जोक्स, संवाद आणि शांती…आपल्या खास मैत्रिणीसोबत लग्न करून एक महिना पूर्ण झाला’, असं कॅप्शन जसप्रीत बुमराहने लिहिलं आहे.

जसप्रीत बुमराह लग्नासाठी ऑस्ट्रेलियात शेवटीची कसोटी खेळला नव्हता. तसेच इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतही भाग घेतला नव्हता. आता आयपीएल २०२१मध्ये बुमराह मुंबई इंडियन्स मैदानात उतरला आहे. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात त्याने २६ धावा देत दोन गडी बाद केले होते. तर कोलकाताविरुद्धच्या सामन्यात १९ वं षटकं टाकत मुंबईला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता.

जसप्रीत बुमराहची पत्नी संजना एक यशस्वी स्पोर्ट्स प्रेझेंटर आहे. लग्नानंतर लगेचच ती इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात कामावर रुजू झाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2021 7:24 pm

Web Title: cricketer jasprit bumrah special message to his wife after one month complete their wedding rmt 84
टॅग : IPL 2021,Jasprit Bumrah
Next Stories
1 दिल्लीविरुद्ध संजू सॅमसनची सिंहगर्जना! सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
2 IPL 2021: हैदराबादविरुद्धच्या भेदक गोलंदाजीचं सिराजनं गुपित केलं उघड
3 IPL 2021 : सनरायजर्सच्या पराभवानंतर ‘या’ तरुणीचे फोटो व्हायरल! कोण आहे ही तरुणी?
Just Now!
X