दिल्ली कॅपिटल्सचा लेग स्पिनर अमित मिश्राची करोना विषाणूची चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे तो आयसोलेशनमधून बाहेर पडला आहे. बायो बबलला करोनाने भेदल्यानंतर यंदाचा आयपीएल हंगाम अर्ध्यातच स्थगित करण्यात आला. बीसीसीआय आता हा हंगाम यंदाच्या टी-२० वर्ल्डकपनंतर खेळवण्याच्या विचारात आहे.

अमित मिश्राने ट्विटरवर कर्मचाऱ्यांसमवेत एक फोटो शेअर केला आहे. “आपले करोना योद्धे खरे नायक आहेत. या लोकांच्या पाठिंब्यामुळे मी बरा झालो. आपण एवढे मोठे बलिदान देत, आहात याबद्दल आम्ही आभारी आहोत”, असे मिश्राने सांगितले. अमित मिश्राला अहमदाबादमध्ये करोनाचा संसर्ग झाला. त्याच्या व्यतिरिक्त संघातील अन्य खेळाडू माघारी परतले होते.

 

 

कोलकाता नाइट रायडर्स संघातील प्रसिद्ध कृष्णा, टिम सेफर्ट, वरुण चक्रवर्ती आणि संदीप वारियर यांनाही करोनाची लागण झाल्याचे आढळले. चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद संघातही करोनाने प्रवेश केला होता. चेन्नईच्या मायकेल हसी आणि लक्ष्मीपती बालाजी यांना तर हैदराबादचा फलंदाज वृद्धिमान साहा यांना करोनाची लागण झाली.