News Flash

#HappyBirthdayVirat: नावाप्रमाणे ‘विराट’ कामगिरी करणाऱ्याला ‘रनतेसर’साठी शुभेच्छा

सचिन, सेहवागसहीत अनेक मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा

#HappyBirthdayVirat

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा आज ३० वा वाढदिवस. विराट आज वयाच्या तिसाव्या वर्षात पदार्पण करतोय. महेंद्र सिंग धोनी नंतर भारतीय संघाची धुरा आपल्या खांद्यावर पेलताना विराट कुठेही कमी पडलेला अद्याप तरी दिसलेले नाही. उलट कर्णधारपदाची जबाबदारी अंगावर विराटच्या फलंदाजीत मोठा सकारात्मक बदल झालेल्याचे त्याने रचलेला धावांचा डोंगर पाहूनच दिसते. यंदाचं वर्षही विराट कोहलीसाठी खासच राहिलेलं आहे. पुढील वर्षही विराटसाठी असेच दमदार धडाकेबाज जावे यासाठी चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा पाऊसच पाडला आहे. #HappyBirthdayVirat हा हॅशटॅग ट्विटवर ट्रेण्ड होताना दिसत आहे. विराटला त्याच्या चाहत्यांबरोबरच अनेक दिग्गजांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जाणून घेऊयात कोण काय म्हणाले आहे विराटला शुभेच्छा देताना…

बीसीसीआय म्हणते आणखीन बऱ्याच मॅच विनिंग इनिंग्स खेळ

पुढील वर्ष तुला आनंदाचे जावो: सचिन तेंडुलकर

भविष्यात तुला खूप यश मिळो: व्ही. व्ही. एस. लक्ष्मण

आणखीन रेकॉर्ड मोड: हरभजन सिंग

धनतेसरच्या दिवशी रनतेसरसाठी शुभेच्छा: विरेंद्र सेहवाग

सुरेश रैना म्हणतो, ‘क्रिकेट सम्राट विराट’

हातातील काढीने जादू करणारा विराट: मोहम्मद कैफ

तुझे पुढील वर्ष आनंदात जावो:चेतेश्वर पुजारा

नावाप्रमाणे कामगिरी करणारा खेळाडू: विनोद कांबळी

आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर तुझेच वर्चस्व राहू दे: प्रग्यान ओझा

रन मशीन विराट: सारंग भालेराव (क्रिकेट समिक्षक)

वाढदिवसाच्या शुभेच्छा: मोहम्मद शमी

मागील वर्षभरात विराटने अनेक विक्रम आपल्या नावावर जमा केले आहेत. सध्या विंडीजविरुद्ध टी-२० मालिकेत विराटला विश्रांती देण्यात आलेली आली आहे. त्यामुळे या सुट्टीचा फायदा घेत विराट आज वाढदिवस साजरा करण्यासाठी पत्नी अनुष्कासोबत उत्तराखंडमध्ये दाखल झाला आहे. अनुष्कानेही एक खास फोटो ट्विट करत विराटला शुभेच्छा दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2018 1:11 pm

Web Title: happy birthday virat wishes pour in as kohli turns 30
Next Stories
1 IND vs WI : ‘विंडीजच्या थॉमसला शिक्षा व्हायलाच हवी’; भारताच्या माजी क्रिकेटपटूचे ट्विट
2 IND vs WI : भ्रष्टाचारी अझरला हा मान का?; गौतमचा ‘गंभीर’ सवाल
3 Happy Birthday Virat : किंग कोहलीशी निगडीत असलेल्या या 10 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?
Just Now!
X