आयपीएलमुळे भारतीय खेळाडूंना इतर संघातील मातब्बर खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळते. नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलच्या बाराव्या हंगामानंतर भारतासह सर्व संघ विश्वचषक स्पर्धेसाठी इंग्लंडमध्ये दाखल झाले आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघही इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. ५ जूनला भारत या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपला पहिला सामना खेळेल. या सामन्याआधी विराट कोहलीने एक अजब मागणी केली आहे.

अवश्य वाचा – महेंद्रसिंह धोनीने विश्वचषकात पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करावी – सचिन तेंडुलकर

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार आणि सलामीचा फलंदाज फाफ डु प्लेसिस आपल्या संघात असता तर बरं झालं असतं असं विधान विराट कोहलीने केलं आहे. नुकतीच इंग्लंडमध्ये सर्व संघांच्या कर्णधारांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी सर्व कर्णधारांना, प्रतिस्पर्धी संघातला कोणता खेळाडू तुम्हाला तुमच्या संघात हवा आहे असा काल्पनिक प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना विराटने फाफ डु प्लेसिसला आपली पसंती दर्शवली.

अवश्य वाचा – विश्वचषकासाठी टीम इंडियाच्या जर्सीमधला बदल पाहिलात का??

पाहूया कोणत्या कर्णधाराने कोणत्या खेळाडूला पसंती दर्शवली आहे.

  • श्रीलंका – कर्णधार दिमुथ करुणरत्ने – बेन स्टोक्स</strong>
  • दक्षिण आफ्रिका – कर्णधार फाफ डु प्लेसिस – राशिद खान किंवा जसप्रीत बुमराह गोलंदाजीसाठी, विराट फलंदाजीसाठी
  • न्यूझीलंड – कर्णधार केन विल्यमसन – राशिद खान
  • पाकिस्तान – कर्णधार सरफराज खान – जोस बटलर
  • विंडीज – कर्णधार जेसन होल्डर – आमचा संघ परिपूर्ण आहे, आम्हाला कोणाचीही गरज नाही
  • बांगलादेश – कर्णधार मश्रफी मोर्ताझा – विराट कोहली
  • अफगाणिस्तान – कर्णधार गुलबदीन नैब – त्या दिवशीच्या सामन्यावर अवलंबून
  • ऑस्ट्रेलिया – कर्णधार अरॉन फिंच – कगिसो रबाडा
  • भारत – कर्णधार विराट कोहली – फाफ डु प्लेसिस

अवश्य वाचा  – विश्वचषकात केदार जाधवची भूमिका महत्वाची असेल – चंद्रकांत पंडीत