सिडनी येथे खेळवण्यात आलेल्या अखेरच्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर १२ धावांनी मात करत मालिकेचा शेवट गोड गेला. १८७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा संघ १७४ धावांपर्यंत मजल मारु शकला. कर्णधार विराट कोहलीने ८५ धावांची खेळी करत चांगली लढत दिली, पण त्याचे प्रयत्नही तोकडे पडले. विराट कोहली आणि हार्दिक मैदानावर असताना एका क्षणाला भारत सामन्यात बाजी मारेल असं वाटत होतं, परंतू ऑस्ट्रेलियाने अखेरपर्यंत सामन्याचं भारतावर अंकुश लावत सामन्यात बाजी मारली.

अवश्य वाचा – कोहलीची कर्णधारपदाला साजेशी खेळी, सचिनच्या विक्रमाशी केली बरोबरी

सामना संपल्यानंतर विराटने भारतीय संघाच्या पराभवाचं कारण सांगितलं. “एका क्षणाला ज्यावेळी हार्दिकने फटकेबाजीला सुरुवात केली त्यावेळी आम्हाला वाटलं की आम्ही सांना जिंकू. पण मधल्या षटकांमध्ये ज्या पद्धतीने विकेट पडल्या त्याचा आम्हाला फटका बसला. हार्दिकसोबत आणखी ३० धावांची भागीदारी झाली असती तर सामन्याचं चित्र वेगळं दिसू शकलं असतं.”

अवश्य वाचा – Ind vs Aus : कोहलीची ‘विराट’ खेळी निष्फळ, अखेरच्या टी-२० मध्ये कांगारुंची बाजी

टी-२० मालिकेत बाजी मारल्यानंतर भारतीय संघासमोर ४ कसोटी सामन्यांचं आव्हान असणार आहे. १७ डिसेंबरपासून अॅडलेडच्या मैदानावर पहिला कसोटी सामना रंगणार आहे. विराट कोहली हा सामना खेळून भारतात परतणार आहे. आपली पत्नी अनुष्काची बाळंतपणात काळजी घेण्यासाठी विराट कोहलीने सुट्टी घेतली आहे.