पहिल्या दोन कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर मात केल्यानंतर, अखेरच्या कसोटी सामन्यातही भारतीय संघाने धडाकेबाज कामगिरी केली आहे. पहिल्या डावात ४९७ धावांचा डोंगर उभा केल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी आफ्रिकेला १६२ धावांवर बाद केलं. विराट कोहलीने यानंतर आफ्रिकेला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. प्रतिस्पर्धी संघावर फॉलोऑन लादण्याची कर्णधार कोहलीची ही आठवी वेळ ठरली आहे.

प्रतिस्पर्धी संघाला नामोहरम करण्यात विराट कोहलीने आपल्या माजी कर्णधारांनाही मागे टाकलं आहे.

  • विराट कोहली – ८ वेळा*
  • मोहम्मद अझरुद्दीन – ७ वेळा
  • महेंद्रसिंह धोनी – ५ वेळा
  • सौरव गांगुली – ४ वेळा

दरम्यान दुसऱ्या डावातही आफ्रिकेची खराब सुरुवात झाली आहे. सलामीवीर क्विंटन डी-कॉक आणि झुबेर हमझा यांना उमेश यादव आणि मोहम्मद शमीने त्रिफळाचीत करुन माघारी धाडलं आहे.