कसोटी आणि वन-डे क्रिकेट गाजवणाऱ्या भारतीय संघाचं टी-२० क्रिकेटमधलं स्थान घसरलं आहे. आपल्या स्थानावरुन भारतीय संघ ३ स्थान खाली घरसत थेट पाचव्या स्थानावर पसरला आहे. आयसीसीने नुकतीच टी-२० क्रिकेटची नवीन क्रमवारी जाहीर केली आहे.

अवश्य वाचा – श्रीशांतकडून राहुल द्रविडला शिवीगाळ !

पाकिस्तानच्या संघाने २८६ गुणांसह आपलं पहिलं स्थान कायम राखलं आहे. नवीन ८० संघासाठीच्या सुधारीत यादीत, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांनी अनुक्रमे दुसरं, तिसरं आणि चौथं स्थान पटकावलं आहे. तर भारतीय संघ २६० गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.

आयसीसीच्या नवीन यादीप्रमाणे सर्वोत्तम १० टी-२० संघ पुढीलप्रमाणे –

१) पाकिस्तान – २८६ गुण

२) दक्षिण आफ्रिका – २६२ गुण

३) इंग्लंड – २६१ गुण

४) ऑस्ट्रेलिया – २६१ गुण

५) भारत – २६० गुण

६) न्यूझीलंड – २५४ गुण

७) अफगाणिस्तान – २४१ गुण

८) श्रीलंका – २२७ गुण

९) विंडीज – २२६ गुण

१०) बांगलादेश – २२० गुण