बॉक्सिंग डे कसोटी सामन्यानंतर समालोचक आणि माजी खेळाडू रिकी पाँटिंग ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजावर भडकला आहे. मेलबर्न येथे झालेल्या सामन्यात पीचमध्ये कोणतीही खराबी नव्हती. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजासमोर खराब प्रदर्शन केलं. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या हातून सामना गेला होता. १३३ धावांमध्ये आघाडीचे सहा गडी बाद करण्यात भारतीय गोलंदाजांना यश आलं होतं. भारतीय गोलंदाजांनी अचूक टप्यावर मारा केला. ऑस्ट्रेलियाचे फलंदाज भारतीय गोलंदाजांचा सामना करण्यात अपयशी ठरले. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला. पराभवापासून वाचवण्यासाठी मनातील बाद होण्याची भिती ऑस्ट्रेलियनं फलंदाजांना घालवावी लागेल. पहिल्या कसोटीत ३६ धावांवर बाद होणाऱ्या भारतीय संघानं दुसऱ्या कसोटी सामन्यात जोरदार मुसंडी मारल्याचे पाँटिंग म्हणाला.

आणखी वाचा : तिसऱ्या कसोटीत रोहित शर्मा खेळणार का? रहाणेनं दिले संकेत

चॅनेल 7 सोबत बोलताना पाँटिंग म्हणाला की, ‘ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजानी अतिशय खराब कामगिरी केली आहे. पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात १९१, दुसऱ्या कसोटीत दोन्ही डावांत १९५ आणि २०० धावा काढल्या. ऑस्ट्रेलियाच्या संघाकडे पाहून ते कसोटी क्रिकेट खेळत नसल्याचं वाटलं. कसोटी क्रिकेटमधील ही धावसंख्या नव्हे. या धावा करण्यासाठीही त्यांना मोठा कालावधी लागला. ऑस्ट्रेलियाचे फलंदाज बाद व्हायला घाबरत होते. त्यामुळे धावगतीही संथ राहिली. फक्त २.५ प्रति षटकानं धावा काढल्या. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी निर्भिडपणे फलंदाजी करायला हवी. तरच कसोटी सामन्यात मोठी धावसंख्या उभारता येऊ शकते. गेल्या वर्षी आणि आताच्या दोन्ही कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियानं तीच चूक केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी धावगतीवर लक्ष द्यायला हवा. आपल्या खेळात सुधारणा करण्यात गरज आहे. ‘

आणखी वाचा :  विजयानंतरचं रहाणेचं ट्विट ठरतेय चर्चेचा विषय

अश्विनविरोधात कसं खेळाल?
आर अश्विननं चांगली गोलंदाजी केली. अश्विनविरोधात खेळताना ऑस्ट्रेलियाचे फलंदाज रक्षात्मक पद्धतीनं फलंदाजी केली. अश्विनने आपल्या गोलंदाजीनं सर्वांनाच प्रभावित केलं आहे. पण एखाद्या सर्वोत्तम गोलंदाजाविरोधात तुम्ही आक्रमक पद्धीतनं फलंदाजी करायला हवी. तुम्ही घाबरुन फलंदाजी कराल तर विकेट द्याल, असा सल्ला पाँटिंगनं कांगारुंना दिला.

भारतीय गोलंदाजाचं कौतुक –
भारताच्या गोलंदाजीचंही पाँटिंगनं कौतुक केलं. बुमराह, अश्विन, जाडेजा यांनीही गोलंदाजी करताना कोणतीही चूक केली नाही. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना एकदाही वरचढ होऊ दिलं नाही. इतकेच नव्हे तर युवा सिराजनेही योग्य टप्प्यावर मारा केला. त्यामुले ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना चूक करण्यास भाग पाडलं.

आणखी वाचा : 

धोनी दांपत्याने Mr and Mrs चहलसाठी होस्ट केली खास डिनर पार्टी; पाहा खास फोटो 

विजयी शॉट अन् राहणेनं केली राहुल द्रविडची बरोबरी

वर्षाचा शेवट गोड, ‘त्या’ पराभवाचा घेतला बदला

३१ वर्षांनंतर भारतीय गोलंदाजांसमोर कांगारुंनी नांगी टाकली; भारताने केली या संघाच्या विक्रमाशी बरोबर