28 May 2020

News Flash

गतविजेत्या चेन्नईची विजयी सुरुवात, घरच्या मैदानात बंगळुरुला लोळवलं

विजयासाठी 71 धावांचं आव्हान चेन्नईकडून सहज पार

गतविजेच्या चेन्नई सुपकिंग्ज संघाने बाराव्या हंगामाची सुरुवात विजयाने केली आहे. पहिल्या सामन्यात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघावर 7 गडी राखून मात करत चेन्नईने पहिला विजय मिळवला आहे. बंगळुरुने दिलेलं 71 धावांचं आव्हान चेन्नईच्या फलंदाजांनी सहज पूर्ण केलं. शेन वॉटसन आणि सुरेश रैना या फलंदाजांना माघारी धाडण्यात बंगळुरुच्या गोलंदाजांना यश आलं. मात्र त्यानंतर अंबाती रायुडू, केदार जाधव आणि रविंद्र जाडेजाने संयमी फलंदाजी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

त्याआधी हरभजन सिंह, इम्रान ताहीर आणि रविंद्र जाडेजा या फिरकीपटूंच्या जोरावर पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपरकिंग्ज संघाने धडाकेबाज सुरुवात केली. सलामीच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला 70 धावांमध्ये रोखण्यात चेन्नईचा संघ यशस्वी झाला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा कर्णधार धोनीचा निर्णय त्याच्या गोलंदाजांनी योग्य ठरवला.

बंगळुरुकडून कर्णधार विराट कोहली आणि पार्थिव पटेल हे फलंदाज सलामीला आले. दोघांनीही बंगळुरुच्या डावाची सावध सुरुवात केली. मात्र झटपट धावा जमवणं दोघांनाही जमलं नाही. अखेर हरभजनसिंहच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात विराट कोहली रविंद्र जाडेजाकडे झेल देऊन माघारी परतला.

यानंतर बंगळुरुच्या डावाची घसरगुंडी उडाली. कोहली माघारी परतल्यानंतर मोईन अली, एबी डिव्हीलियर्स आणि शेमरॉन हेटमायर हे फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतले. बंगळुरु आयपीएलमधील सर्वातत निचांकी धावसंख्या नोंदवणार अशी भीती वाटत असताना सलामीवीर पार्थिव पटेलने तळातल्या फलंदाजांना सोबत घेऊन संघावरची नामुष्की टाळली. पार्थिवने संघाकडून सर्वाधिक 29 धावा पटकावल्या. चेन्नईकडून हरभजन सिंह, इम्रान ताहीरने प्रत्येकी 3-3, रविंद्र जाडेजाने 2 तर ड्वेन ब्राव्होने 1 बळी घेतला. बंगळुरुचा एक फलंदाज धावबाद झाला.

लोकसत्ता समालोचन

Live Blog

Highlights

 • 21:50 (IST)

  चेन्नईला पहिला धक्का, शेन वॉटसन त्रिफळाचीत

  युजवेंद्र चहलने उडवला वॉटसनचा त्रिफळा

 • 20:38 (IST)

  पदार्पण केलेला हेटमायर शून्यावर माघारी, बंगळुरुला चौथा धक्का

  चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न करताना हेटमायर माघारी.

 • 20:35 (IST)

  हरभजनच्या खात्यात तिसरा बळी, डिव्हीलियर्स बाद

  मोठा फटका खेळण्याचा डिव्हीलियर्सचा प्रयत्न फसला, बंगळुरुचा तिसरा गडी माघारी

 • 20:17 (IST)

  बंगळुरुला पहिला धक्का, कर्णधार विराट माघारी

  हरभजन सिंहच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात विराट कोहली रविंद्र जाडेजाच्या हाती झेल देऊन माघारी

23:04 (IST)23 Mar 2019
गतविजेत्या चेन्नईची विजयी सुरुवात, घरच्या मैदानात बंगळुरुला लोळवलं

गतविजेत्या चेन्नईची विजयी सुरुवात, घरच्या मैदानात बंगळुरुला लोळवलं

22:47 (IST)23 Mar 2019
अंबाती रायुडू माघारी, चेन्नई विजयाच्या नजीक

मोहम्मद सिराजने उडवला रायुडूचा त्रिफळा

22:23 (IST)23 Mar 2019
चेन्नईचा दुसरा गडी माघारी, सुरेश रैना बाद

मोईन अलीच्या गोलंदाजीवर रैना मोठा फटका खेळण्याच्या नादात झेलबाद

22:22 (IST)23 Mar 2019
सुरेश रैनाचा विक्रम, आयपीएलमध्ये 5 हजार धावा काढणारा पहिला फलंदाज

15 धावा काढत रैनाकडून इतिहासाची नोंद

21:50 (IST)23 Mar 2019
चेन्नईला पहिला धक्का, शेन वॉटसन त्रिफळाचीत

युजवेंद्र चहलने उडवला वॉटसनचा त्रिफळा

21:21 (IST)23 Mar 2019
बंगळुरुचा अखेरचा गडी माघारी, पार्थिव पटेल बाद

बंगळुरुची 70 धावांपर्यंत मजल, चेन्नईला विजयासाठी 71 धावांचं माफक आव्हान

21:18 (IST)23 Mar 2019
बंगळुरुचा नववा गडी माघारी, उमेश यादव त्रिफळाचीत

रविंद्र जाडेजाने उमेशचा त्रिफळा उडवत बंगळुरुला आणखी एक धक्का दिला.

21:08 (IST)23 Mar 2019
बंगळुरुला आठवा धक्का, युझवेंद्र चहल बाद

इम्रान ताहीरच्या गोलंदाजीवर हरभजनने घेतला झेल

20:57 (IST)23 Mar 2019
नवदीप सैनी माघारी, बंगळुरुचा सातवा गडी तंबूत परतला

इम्रान ताहीरने घेतला बळी

20:50 (IST)23 Mar 2019
बंगळुरुची पडझड सुरुच, कॉलिन डी-ग्रँडहोम बाद

रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर धोनीने घेतला झेल, बंगळुरुचा सहावा गडी माघारी

20:47 (IST)23 Mar 2019
शिवम दुबे माघारी, बंगळुरुला पाचवा धक्का

इम्रान ताहीरच्या गोलंदाजीवर शेन वॉटसनने पकडला झेल.

20:38 (IST)23 Mar 2019
पदार्पण केलेला हेटमायर शून्यावर माघारी, बंगळुरुला चौथा धक्का

चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न करताना हेटमायर माघारी.

20:35 (IST)23 Mar 2019
हरभजनच्या खात्यात तिसरा बळी, डिव्हीलियर्स बाद

मोठा फटका खेळण्याचा डिव्हीलियर्सचा प्रयत्न फसला, बंगळुरुचा तिसरा गडी माघारी

20:24 (IST)23 Mar 2019
मोईन अली ठरला हरभजनच्या फिरकीचा शिकार

आपल्याच गोलंदाजीवर झेल पकडत हरभजनचा बंगळुरुला दुसरा दणका

20:17 (IST)23 Mar 2019
बंगळुरुला पहिला धक्का, कर्णधार विराट माघारी

हरभजन सिंहच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात विराट कोहली रविंद्र जाडेजाच्या हाती झेल देऊन माघारी

20:16 (IST)23 Mar 2019
बंगळुरुची सावध सुरुवात

कर्णधार विराट कोहली आणि पार्थिव पटेल यांनी संघाला सावध सुरुवात करुन दिली.

19:35 (IST)23 Mar 2019
असा असेल बंगळुरुचा संघ...
19:34 (IST)23 Mar 2019
असा असेल चेन्नईचा संघ...
19:28 (IST)23 Mar 2019
महेंद्रसिंह धोनीने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

पहिल्या सामन्यात चेन्नई केवळ 3 परदेशी खेळाडूंना संधी देणार

<p class="appstext"><img src="https://images.loksatta.com/2020/03/telegram-26-03-2020.png" width="24" height="24" style="margin-right:0;"><strong><em>लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल <a onclick="ga( "send", "event", "Telegram_Click", "click", "https://t.me/LoksattaLiveOfficial" );" href="https://t.me/LoksattaLiveOfficial" target="_blank"> (@Loksatta) </a> जॉइन करण्यासाठी <a href="https://t.me/LoksattaLiveOfficial" target="_blank" onclick="ga( "send", "event", "Telegram_Click", "click", "https://t.me/LoksattaLiveOfficial" );"> येथे क्लिक करा </a> आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.</em></strong></p>
Next Stories
1 ‘यॉर्कर किंग’ मलिंगाची निवृत्तीची घोषणा
2 …तर आतापर्यंत घरी बसलो असतो ! गौतमच्या टिकेला विराटचं ‘गंभीर’ प्रत्युत्तर
3 IPL 2019 : मला विराटची भीती वाटते – ऋषभ पंत
Just Now!
X