चेन्नई सुपरकिंग्जचा फलंदाज सुरेश रैनाने रविवारी टी-20 क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. भारतीय खेळपट्टीवर टी-20 क्रिकेटमध्ये 6 हजार धावांचा टप्पा ओलांडणारा सुरेश रैना पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. रविवारी चेपॉकच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात रैनाने ही कामगिरी केली.

चेन्नईच्या संघाकडून सुरेश रैनाचा हा 150 वा सामना होता. रैनाने 32 चेंडूत 36 धावांची खेळी केली. या खेळीत 4 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. सुरेश रैना आणि महेंद्रसिंह धोनीने केलेल्या भागीदारीमुळे खराब सुरुवात झालेला चेन्नईचा डाव सावरला. टी-20 क्रिकेटमध्ये रैनाच्या नावावर सध्या 8058 धावा जमा आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापैकी आयपीएलमध्ये रैनाच्या नावावर 5 हजार 70 धावांची नोंद आहे. काही दिवसांपूर्वी बंगळुरुविरुद्ध झालेल्या सामन्यात सुरेश रैनाने आयपीएलमध्ये सर्वात प्रथम 5 हजार धावांचा टप्पा ओलांडण्याचा पराक्रम केला होता. उर्वरित 1605 धावा रैनाने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये भारताकडून काढल्या आहेत.

अवश्य वाचा – IPL 2019 : धोनीचं दैव बलवत्तर, बॉल स्टम्पला लागूनही Not Out