आयपीएल १२ ही स्पर्धा आता अंतीम टप्यात येऊन ठेपली आहे. साखळी सामन्यातील प्रत्येक संघाचे फक्त दोन सामने शिल्लक आहेत. मात्र तरीही, अद्याप प्लेऑफसाठीचे अंतिम चार संघ निश्चित झालेले नाहीत. दिल्ली आणि चेन्नईच्या संघ प्लेऑफमध्ये आधीच पोहोचले आहेत. दोन्ही संघाने १२ सामन्यापैकी ८ विजय मिळत १६ गुणांसह प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे. चांगल्या नेट रनरेटमुळे दिल्लीची टीम पहिल्या तर चेन्नई दुसऱ्या क्रमांकावर आहे. ८ पराभवासह बंगळुरूचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. मात्र, उरवरीत दोन सामने जिंकून बंगळुरू संघ शेवट गोड करण्याच्या इराद्याने मैदानावर उतरेल. बंगळुरूचे अखेरचे दोन सामने जिंकले तर इतर संघाचे प्लेऑफमधील आव्हान आधिक खडतर होऊ शकते.

सध्याच्या पॉईंट्स टेबलवर नजर टाकली तर प्लेऑफच्या शेवटच्या दोन स्थानांसाठी पाच संघात चुरस असल्याचे दिसते. यामध्ये मुंबई, हैदराबाद, कोलकाता, पंजाब आणि राजस्थान या संघाचा समावेश आहे. मुंबई संघ १४ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. एक सामना जिंकून प्लेऑफमधील स्थान पक्के करण्याच्या दृष्टीने मुंबईचा संघ प्रयत्न करेल. पण दोन्ही सामन्यात मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला, तर इतर टीमची कामगिरी आणि मुंबईचा नेट रनरेट यावर प्लेऑफचे भवितव्य अवलंबून असेल. जाणून घेऊयात गुणतालिकेत कोणता संघ कोणत्या स्थानी आहे.

संघ सामनेविजयपराभवनेट रनरेटगूण
दिल्ली कॅपिटल्स१२+ ०.२३३१६
चेन्नई सुपरकिंग्ज१२– ०.११३१६
मुंबई इंडियन्स१२+ ०.३४७१४
सनराईजर्स हैदराबाद१२+ ०.७०९१२
कोलकाता नाईट रायडर्स१२+ ०.१००१०
किंग्ज इलेव्हन पंजाब१२– ०.२९६१०
राजस्थान रॉयल्स१२– ०.३२११०
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु१२– ०.६९४०८